पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

येवल्यात सुसज्ज क्रिकेट स्टेडियम उभारणार - मंत्री छगन भुजबळ

इमेज
सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत–जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आर जे लाइव्ह कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध. येवला प्रिमीयर लिग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे भुजबळ ब्रिगेड आयोजित वायपीएलच्या महाविजेते पदी शिवनेरी चॅलेंजर्स लासलगाव तर उपविजेते पदी येवला मास्टर्स माजी खा.समीर भुजबळ व त्यांची टीम येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ देईल - मंत्री छगन भुजबळ येवला,दि.१० एप्रिल:- येवला शहरात दोनशे वर्षांहून अधिक जुने टेनिस कोर्ट असून येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठी परंपरा आणि इतिहास आहे.आगामी काळात येवल्याच्या या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ देण्याचे काम समीर भुजबळ आणि त्यांची टीम करेल. या येवला शहरात सुसज्ज असे क्रिकेट स्टेडियम उभारले जाईल असे प्रतिपादन प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा महाअंतिम सामना व समारोप सोहळा राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,आंतरराष्ट्रीय क्रिक...

इंदिरानगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन

इमेज
नाशिक  :- इंदिरानगर परिसरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगरच्या वतीने नाशिक महानगरपालिकेकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन उपायुक्त सुवर्ण दखने यांना देण्यात आले.यावेळी उपायुक्त सुवर्ण दखने यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन भाजपा शिष्टमंडळाला दिले.इंदिरानगर परिसरात वाढलेल्या अनधिकृत बांधकामे,हातगाड्या, पानटपऱ्या व अव्यवस्थित पार्किंगमुळे वाहतूक कोंडी,अपघातांचा धोका तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतःअशोका हॉस्पिटल परिसर व अशोका मार्ग येथे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार,सुनील देसाई सरचिटणीस,भाजपा नाशिक महानगर, ॲड.श्याम बडोदे गटनेता तथा सरचिटणीस-भाजपा नाशिक महानगर नगरसेवक चंद्रकांत खोडे,दिपाली कुलकर्णी,ॲड.अजिंक्य साने,मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सुनील खोडे,प्रवीण भाटे,अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा नाशिक महानगर,निखिल खोडे,सचिन कुलकर्णी,बबलू परदेशी प्रकाश ननावरे,आदी उपस्थित होते.प्रशासनाने लवकरात लवकर ठोस प...

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

इमेज
झोपडपट्टी प्राधिकरणाची १६ वी बैठक संपन्न मुंबई,दि.१० :- घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अपात्र झोपडीधारकांना सुद्धा भाडेतत्वावरील घरे योजनेतर्गत घरे देण्यात यावीत.तसेच स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,बृहन्मुंबई (एसआरए) ची १६ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा हस्ते प्राधिकरण कार्यालयातील विविध कक्षांचे ऑनलाइन उ‌द्घाटन झाले.झोपुप्रा,बृहन्मुंबईने संपादित केलेल्या “बृहन्मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे”या पुस्तकाचे आणि प्राधिकरणाच्या दिनदर्शिकेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ,गृहनिर्माण अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता,बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे,मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा,प्रधान सचिव ड...

ना.रोड परिसरातील विकास कामांचा प्रशासनातर्फे आढावा आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित

इमेज
#India Maharashtra #nashik city #NMC #latest news #Kumbh Mela2027 #maharastra #breaking news  नांदूर–दसक स्मशानभूमी व परिसर विकास कामांचा प्रशासनातर्फे आढावा (प्रतिनीधी समाधान शिरसाठ) नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नांदूर–दसक स्मशानभूमी परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेसह मोठ्या प्रमाणातील गर्दी व्यवस्थापनाचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत स्मशानभूमी क्षेत्राचे रुंदीकरण करण्यात येणार असून,संपूर्ण परिसर अधिक प्रशस्त व सुव्यवस्थित केला जाणार आहे.तसेच,संबंधित प्लॅटफॉर्मचे समतलीकरण करून तो अधिक सक्षम व सुरक्षित करण्यात येईल,ज्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांना सुलभतेने प्रवेश व वापर करता येईल.परिसरातील पादचारी दळणवळण सुलभ व सुरक्षित व्हावे यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार असून,गर्दीच्या काळातही सुरळीत व्यवस्थापन सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.या पाहणी वेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस कर्मचार...

भाजपचे उपायुक्त मोनिका राऊत यांना निवेदन: सीसीटीव्ही गस्त वाढवा,नाशिकमधील आयटी कंपन्या सुरक्षित करा!

इमेज
#breaking news#latest news #Maharashtra #Nashik crime#BJP Nashik #Nashik city police #Nashik  नाशिक : शहरातील आयटी कंपनीच्या आडून सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचार,लैंगिक शोषण,धर्मांतराचा दबाव तसेच परिसरातील वाढत्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रकारांविरोधात भाजप आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नाशिक महानगरचे अध्यक्ष सुनील केदार,यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.सदर निवेदनात आयटी कंपनी प्रकरणातील गंभीर बाबींचा उल्लेख करत,फरार आरोपींना तात्काळ अटक करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी करण्यात आली.महिलांवर झालेल्या अत्याचारांबाबत कठोर कारवाई करावी तसेच संबंधित कंपनीची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास ती सील करण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय शहरातील सर्व आयटी कंपन्या व कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी (Police Verification) बंधनकारक करावी,तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही तात्काळ पडताळणी करावी,अशीही मागणी करण्यात आली.शिष्टमंडळाने अशोका हॉस्पिटल परिसरासह इतर...

नारळी सप्ताहात भक्तीचा जागर! गहिनीनाथ गडाच्या वैभवात भर टाकणार - देवेंद्र फडणवीस

इमेज
Maharashtra,Breaking news,latest news,Beed City,latest update, political,religion,CM Devendra fadnavis,minister Pankaja Munde, नारळी सप्ताहाच्या समारोपास लाखो भाविकांची उपस्थिती बीड दि. ९ :- “मी येथे मुख्यमंत्री म्हणून नाही, तर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे.गहिनीनाथ गडाच्या विकासासाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहे,”असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या 94 व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या या पवित्र परंपरेचा समारोप गुरुवारी (दि. ९) कल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी गहिनीनाथ गडाचे विठ्ठल महाराज,पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,आमदार सुरेश धस,आमदार धनंजय मुंडे, माजी आमदार भीमराव धोंडे,माजी आमदार साहेबराव दरेकर,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बाळासाहेब आजबे,प्रताप ढाकणे,सरपंच शिवा शेकडे आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,“संत वामनभाऊ यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. नाथ संप्...

पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने मनपाची धडक मोहीम दंडात्मक कारवाई

इमेज
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- महानगरपालिकेच्या वतीने पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने विभागीय अधिकारी यांचे अधिपत्याखाली दि.१३ एप्रिल २०२६ पासून धडक मोहीम हाती घेतली जाणार असून मोहिमेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई मनपाच्या वतीने करण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेमार्फत नाशिक शहरात पाणी पुरवठा करणेत येतो,काही भागात असे निदर्शनास आले आहे की, काही भागात काही कनेक्शनधारकांनी नळाला तोट्या बसविल्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो. तसेच काही ठिकाणी कनेक्शनधारकांनी पाण्याच्या नळ जोडणीच्या पाईपलाच थेट विद्युत मोटारी लावल्याने त्या ठिकाणच्या इतर कनेक्शनधारकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. यासाठी महानगरपालिके आयुक्त यांचेकडील जा.क्र./मनपा/पापुवि/१८/२०१७ दि.०७/०४/२०१७ रोजीच्या कार्यालयीन आदेशान्वये दिनांक १३/०४/२०२६ पासुन विशेष मोहीम विभागीय अधिकारी यांचे अधिपत्याखाली राबविण्यात येणार आहे.या मोहिमेच्या तपासणीत १)ज्या ठिकाणी नळाला तोटी नसेल तेथे तोटी बसविण्यात येईल व कनेक्शन धारकांकडुन र.रु. १००/- दंड बसून करणेत येईल.२)नळ जोडणीत जलमापक नसल्यास/नादुरुस्त/बंद आढळल्यास नियमातील...

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ’ उपक्रमास सुरुवात; विशेष हर्निया पॅकेजचेही लोकार्पण

इमेज
विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे हर्निया या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ’या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.उपक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ GI सर्जन डॉ.संदीप सबनीस करत असून,त्यांच्या सर्जिकल टीममध्ये डॉ. प्रखर गुप्ता,डॉ.उर्विक पाटील तसेच संपूर्ण GI सर्जरी टीम सहभागी आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून हर्नियाचे लवकर निदान, आधुनिक उपचारपद्धती आणि सुरक्षित शस्त्रक्रिया याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हर्निया हा पोटाच्या स्नायूंमध्ये निर्माण झालेल्या कमकुवत भागामुळे होणारा आजार असून, वेळेवर उपचार न केल्यास तो गंभीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर या विशेष महिन्यात रुग्णांना तज्ज्ञ सल्लामसलत, तपासण्या आणि अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.याच निमित्ताने रुग्णांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष ह...

नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर

इमेज
नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई दि.७:- नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा पूर्णतःसज्ज ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.आरोग्य मंत्रालयातील समिती कक्षात आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी नाशिक परिमंडळातील आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मंत्री आबिटकर म्हणाले की,यंदा सिंहस्थ पर्वणी निमित्त नाशिक मधील तेरा घाटावर अंदाजे १२ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी,कुंभमेळा प्राधिकरण आणि विविध विभागांच्या समन्वयातून त्र्यंबक, रामकुंड,सीता गुंफा,साधू धाम,मुक्ती धाम व इतर धार्मिक स्थळावर आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात यावा. लवकरच स्वतःनाशिक येथे भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्...

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमेज
सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही नाशिक,दि.५ :- प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिर येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,अखिल भारतीय संत समिती अध्यक्ष अविचल देवाचार्यजी, महंत श्री ग्यान देवसिंग महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी महाराज,संत निवृत्ती महाराज, रावसाहेब महाराज गोसावी,पुरुषोत्तम महाराज देहूकर,अशोक तिवारी,श्री यतिंद्रानंद गिरीजी महाराज,जनार्दनहरी महाराज,स्वा...

घरपट्टी पाणीपट्टीचे इंडेक्स क्रमांक बंद करण्याचे फेक मॅसेज प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

इमेज
PRASIDDHI PRAMUKH (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) नाशिक :- महानगरपालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीचे इंडेक्स क्रमांक बंद करण्याचे फेक मेसेज पाठवणाऱ्यान विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नाशिक शहरातील रहिवाशांना आपली घरपट्टी व पाणीपट्टी अनुक्रमांक अद्यावत नाहीत ते अद्यावत करण्यासाठी संपर्क क्रमांकावर संपर्क करावा अशा आशयाचे मेसेज फेक भ्रमणध्वनी क्रमांक 6297019792 व 6005481746 यावरून जात आहेत.अश्या स्वरूपाचे कोणतेही मेसेज नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पाठविले जात नाहीत.अश्या प्रकारचे मेसेज प्राप्त झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.ज्या दोन फेक क्रमांकावरून मेसेज जात होते ते दोन्ही क्रमांक पोलीस खात्याच्या सायबर विभागाने बंद केलेले आहेत.फेक मेसेज प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.नाशिक शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी व घरपट्टीबाबतच्या अफवा पसरवणाऱ्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे व त्यास कुठलाही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या वतीने करण्यात आले आहे.याप्रकरणी नाशिक महानगरपालिका उपाय...

कळवण येथे मोठ्या उत्साहात विराट हिंदू संमेलन संपन्न

इमेज
PRASIDDHI PRAMUKH  कळवण :- विराट हिंदू संमेलन,कळवण शहर समिती मार्फत विराट हिंदू संमेलनाचे आयोजन दि.४ एप्रिल 2026 रोजी करण्यात आले.या संमेलनाच्या आदल्या दिवशी भव्य बाईक रॅलीचेही काढण्यात आली सपूर्ण कळवण शहर या निमित्ताने भगवेमय झाले.बाईक रॅलीत तसेच सर्वच कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.महिलांचे फेटे व पुरुषांचे भगवे टोप्या हे खास आकर्षण होते.हिंदू संमेलना प्रसंगी शोभा यात्रा काढण्यात आली.यात्रेची सुरुवात गांधी चौकातून होऊन भाजी मार्केट मार्गे बस स्थानक व मेनरोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक फुलाबाई चौक,बाजार पेठ मार्गाने गांधी चौकात समारोप करण्यात आला.यावेळी ठिकठिकाणी फटाक्याच्या आतषबाजीने शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले.शोभा यात्रेनंतर हिंदू संमेलनास सुरुवात झाली.दीप प्रज्वलन,छत्रपती शिवाजी महाराज,भारत मातेच्या प्रतिमांचे पूजन,तसेच आलेल्या मान्यवरांचे सुरवातीस औक्षण त्यानंतर प्रस्तावना करण्यात आली.प्रस्तावनेत संघ परिवार व हिंदू संमेलन चे उद्देश सांगण्यात आले.त्यानंतर सटाणा येथील गोसेवक मंगेश खैरनार यांनी हिंदुत्वाचे महत्त्व विषद केले.गोसेवा,राष्ट्रसेवा सम...

महसूल अधिकारी,कर्मचाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

इमेज
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत महसूल अधिकाऱ्यांना निर्देश नाशिक :- महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून निश्चित केलेल्या दिवशी जिल्ह्यातील गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवीत गतिमान प्रशासनाचा नागरिकांना अनुभव द्यावा,असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी आयोजित आढावा बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, आ.किशोर दराडे,आ.नितीन पवार, आमदार दिलीप बनकर,आ.ॲड.राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,सहायक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव),हेमांगी पाटील (नाशिक) मुद्रांक जिल्हाधिकारी संदीप आहेर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप, यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘महसूल हस्तपुस्तिका : महसूल प्रशासनाचे आधुनिक स्वरूप’या पुस्तिकेचे ...

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून रामकालपथसह विविध विकास कामांची पाहणी

इमेज
नाशिक :- ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’च्या अनुषंगाने नाशिक शहरातील धार्मिक, ऐतिहासिक व पायाभूत सुविधा असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांचा आढावा घेतला.भाविकांना सुलभ,सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह,महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, पुरातत्व विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,कुंभमेळा प्राधिकारणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, सहाय्यक संचालक अमोल गोटे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, शहर अभियंता संजय अग्रवाल,महावितरणचे सहाय्यक अभियंता शशांक पेंढारकर,कुंभमेळा प्राधिकरणाचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.पाहणी दरम्यान प्रादेशिक वस्तू संग्रहालय नाशिक येथे पर्यटकांसाठी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या स...

नाशिककरांनो सावधान! तुमच्या मालमत्तेचे नशीब बदलणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'हा' निर्णय वाचला का?

इमेज
आडगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ नाशिक :- नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करत आहे,अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.आज नाशिक तहसील व अपर तहसील कार्यालयातर्फे आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री बावनकुळे बोलत होते.यावेळी आमदार ॲड राहुल ढिकले,विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,अपर जिल्हाधिकारी देवता केकाण, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे,मुद्रांक जिल्हाधिकारी संदिप आहेर,भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक महेश इंगळे,तहसीलदार पंकज पवार,अपर तहसीलदार अमोल निकम,धान्य वितरण अधिकारी शामली धपाडे,नगरसेविका इंदुबाई खेताडे रिद्धेश निमसे,ॲड.नामदेव शिंदे, यांच्यासह अधिकारी,पदाधिकारी,नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की,1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना प्रॉप...

साधू संतांच्या मार्गदर्शनातून नाशिक कुंभ जगासाठी आदर्श ठरेल - मंत्री छगन भुजबळ

इमेज
कुंभमेळा २०२७ आस्था,विकास,स्वच्छता, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाचा भव्य संगम - मंत्री छगन भुजबळ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रथमतः स्वच्छ, निर्मळ गोदावरीसाठी प्राधान्य - मंत्री छगन भुजबळ PRASIDDHI PRAMUKH  नाशिक,दि.४ एप्रिल :- आगामी नाशिक कुंभमेळा २०२७ हा केवळ धार्मिक पर्व नसून आस्था, विकास, स्वच्छता, सुशासन आणि सांस्कृतिक अभिमानाचा भव्य संगम असणार आहे. हे कुंभ पर्व साधू संतांच्या मार्गदर्शनातून जगासाठी आदर्श ठरेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.नाशिक शहरातील स्वामी नारायण मंदिर येथे आयोजित अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय परिषद बैठकीत ते बोलत होते.यावेळी मंत्री दादाजी भुसे,मा.खासदार हेमंत गोडसे,महंत स्वामी सुब्रह्मण्यम भारती,महंत राजेंद्र दास,महंत रवींद्र पुरी,महंत प्रसाद महाराज अमळनेरकर,विश्व हिंदू परिषदेचे दिनेश चंद्रा,आयडीएसएचे अभ्यासक आशिष शुक्ल, उपमहापौर विलास शिंदे,नगरसेवक कैलास मुदलियार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्यासह देशभरातून आलेले पूज्य संत,महंत,आचार्य,धर्माचार्य, अधिक...

"एसटी प्रवासात सुविधा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे अनावरण

इमेज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती PRASDDHI PRAMUKH  मुंबई, :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ,पारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे.याच दिशेने ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे,तसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक,दिव्यांग,महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड वितरित क...

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

इमेज
वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड मुंबई, दि. ३ :- शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.दि. २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली. हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.याशिवाय घटनास्थळावरून १९.२ किलो क्षमतेचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर तसेच ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस, २ टँकर आणि २६ सिलेंडर असा सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दक्षता पथकाच्या माहितीनुसार,जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे २४८० कुटुंबां...

विद्यार्थ्यांनी भविष्यात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे - मिता चौधरी

इमेज
नाशिक :- “विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगातून शिकावे, समस्या ओळखून त्यावर उपाय शोधावेत आणि भविष्यात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी केले. नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग,सिमेन्स कंपनी व ISPF (Innovation and Science Promotion Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने “हॅकथॉन चॅलेंज २०२५-२६”स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलतांना मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी सांगितले की,या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग ठेवण्याचे व विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो,असे त्यांनी नमूद करून सिमेन्स कंपनीच्या सहकार्याबद्दल विशेष कौतुक केले.शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून नाशिक महानगरपालिकेच्या निवडक २४ शाळांमध्ये “जिज्ञासा प्रकल्प” राबविण्यात येत आहे.या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच...

स्वच्छ नंदिनी - स्वच्छ गोदावरी मलनिस्सारण प्रकल्पांना वेग नदीपात्र स्वच्छतेस गती

इमेज
स्वच्छ नंदिनी - स्वच्छ गोदावरी मलनिस्सारण प्रकल्पांना वेग नदीपात्र स्वच्छतेस गती  नाशिक :- शहरातील सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आढावा घेतला. शहरात विविध ठिकाणी सांडपाणी अडवून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्रांकडे (STP) वळविण्याची व्यवस्था उभारण्यात येत आहे,या माध्यमातून थेट नदीपात्रात जाणारे सांडपाणी रोखण्यावर भर दिला जात आहे.याच अनुषंगाने मनपा आयुक्तांनी नंदिनी नदी परिसरातील महत्त्वाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आगार टाकळी येथील नंदिनी-गोदावरी संगमावर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामाची गुणवत्ता अबाधित राखत सर्व प्रलंबित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.सिंहस्थ कुंभमेळा २०२७ करिता उपलब्ध असलेला अल्प कालावधी लक्षात घेता, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात PPP-HAM मॉडेल तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पांना गती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.पाटबंधारे विभागामार्फत बांधण्...

मतदार यादी विशेष सखोल पुर्नरिक्षण मोहिमेसाठीजिल्ह्यात ४ एप्रिल रोजी विशेष शिबिरांचे आयोजन

इमेज
नाशिक,(जिमाका नाशिक)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी काळात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुर्नरक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील नावे अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी व्यापक पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.या विशेष पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांना प्रत्यक्ष पडताळणीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार, 4 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.मतदार नागरीकांनी आपल्या नावाची पडताळणी करून आवश्यक ती माहिती सादर करावी,तसेच नावांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्यात,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.या मोहिमेद्वारे ज्या मतदारांची नावे सन 2024 च्या मतदार यादीत समाविष्ट आहेत, त्यांच्या नावांची सन 2002 च्या मतदार यादीतील नावाशी मॅपिंग करण्यात येणार आहे.तसेच ज्या मतदारांची नावे सन 2024 मध्ये आहेत, मात्र सन 2002 मध्ये...

लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी मनपा कर्मचारी निलंबित,गुन्हा दाखल

इमेज
नाशिक  :- महानगरपालिकेच्या पंचवटीतील घनकचरा विभागातील सफाई कर्मचारी मनीष जाधव यांनी करदाते व नाशिक महापालिकेची आर्थिक नुकसान करून सुमारे १८ लाख रुपयांचे अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून,सदर कर्मचाऱ्यावर मनपा प्रशानाकडून निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.मनपा पंचवटी विभागीय कार्यालय अंतर्गत असलेल्या घनकचरा विभागात सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने दि.१० सप्टेंबर २५ ते १९ जानेवारी २६ या कालावधीत मालमत्ता करदात्यांकडून थकबाकीची रक्कम रोख स्वरूपात स्वतःकडे ठेवून त्या बदल्यात नाशिक महानगरपालिकेच्या विविध भरणा केंद्रात स्वतःच्या नावे बँक खात्याचे चेक जमा करून पावती स्वीकारली हे सर्व चेक खात्यात पुरेशी रक्क्म शिल्लक नसल्याने न वटवता परत आल्याचे प्राथमिक चौकशी अंती आढळून आले आहे.निदर्शनास आलेल्या बाबी लक्षात घेता सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने स्वतःचे फायदया करिता शासनाची रक्कम रूपये १७,६३,२५१/- ची आर्थिक फसवणुक करून अपहार केला आहे.त्यावरून सहाय्यक अधीक्षक उदय खैरनार यांनी पंचवटी पोलिसात सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याच्या विरोधात अपहार...

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ

इमेज
मुंबई,दि.१:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट,तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये,या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहे,ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब...

‘व्हर्टिगो’च्या त्रासातून व्हा मुक्त! अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष क्लिनिक

इमेज
व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करावे नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे चक्कर येणे (Vertigo), तोल जाणे आणि संतुलनाशी संबंधित समस्यांवर अचूक निदान व उपचार देण्यासाठी विशेष ‘व्हर्टिगो क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक दर बुधवारी कार्यरत राहणार असून, न्यूरोलॉजी आणि कान-नाक-घसा (ENT) तज्ज्ञांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली रुग्णांना सर्वसमावेशक उपचार सेवा उपलब्ध होणार आहे.या क्लिनिकचे नेतृत्व न्यूरोलॉजिस्ट डॉ.विशाल सावळे पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ.प्राची पवार आणि कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ.पंकज भट करणार आहेत.या उपक्रमामुळे चक्कर येणे, असंतुलन, डोके हलके वाटणे,कानातील समस्या किंवा मेंदूशी संबंधित कारणांमुळे होणाऱ्या त्रासाचे अचूक निदान आणि योग्य उपचार एकाच ठिकाणी मिळणार आहेत.यावेळी बोलताना डॉ. विशाल सावळे पाटील म्हणाले,“व्हर्टिगो ही अनेक कारणांनी उद्भवणारी समस्या आहे आणि तिचे योग्य निदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेंदू,नसांशी संबंधित आजार किंवा रक्तपुरवठ्यातील बदल यामुळेही चक्कर येऊ शकते. या क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना अचूक निदान आणि योग्य उपचार देण्याचा प्रयत्न क...