येवल्यात सुसज्ज क्रिकेट स्टेडियम उभारणार - मंत्री छगन भुजबळ
सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत–जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आर जे लाइव्ह कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध.
भुजबळ ब्रिगेड आयोजित वायपीएलच्या महाविजेते पदी शिवनेरी चॅलेंजर्स लासलगाव तर उपविजेते पदी येवला मास्टर्स
माजी खा.समीर भुजबळ व त्यांची टीम
येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ देईल - मंत्री छगन भुजबळ
येवला,दि.१० एप्रिल:- येवला शहरात दोनशे वर्षांहून अधिक जुने टेनिस कोर्ट असून येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठी परंपरा आणि इतिहास आहे.आगामी काळात येवल्याच्या या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ देण्याचे काम समीर भुजबळ आणि त्यांची टीम करेल. या येवला शहरात सुसज्ज असे क्रिकेट स्टेडियम उभारले जाईल असे प्रतिपादन प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा महाअंतिम सामना व समारोप सोहळा राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाण, माजी खासदार समीर भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि.९ एप्रिल रोजी गोशाळा मैदान,येवला येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात व दिमाखात संपन्न झाला.यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर,डॉ.शेफाली भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, संभाजी पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी,उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड,माजी नगराध्यक्ष हुसेन शेख,बंडू क्षीरसागर,ज्येष्ठ नेते अरुण थोरात,शहराध्यक्ष दत्ता निकम, नगरपालिकेचे गटनेते दीपक लोणारी,नगरसेवक पारुल गुजराथी,नगरसेवक प्रवीण बनकर, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक जावेद लखपती,माजी सभापती संजय बनकर,प्रमोद सस्कर,सूरज पटणी,मोहन शेलार,रतन बोरनारे, राजेंद्र भांडगे,नितीन गायकवाड,समाधान जेजुरकर,मकरंद सोनवणे,मच्छिंद्र थोरात,सुनील पैठणकर,अल्लेश कासलीवाल,सुहास भांबारे,संतोष खैरनार, सचिन सोनवणे,संयोजक राजू पवार,यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,येवल्यामध्ये दोनशे वर्ष जुने टेनिस कोर्ट असून येथील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. येवल्याच्या विकासाच्या दृष्टीने आपण अनेक प्रकल्प राबविले आहे.क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देखील आपण कामे केली असून यापुढील काळातही येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचे काम करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.माजी खासदार समीर भुजबळ व त्यांच्या टीमने ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.हा त्याचाच एक भाग असून यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची सर्व टीम युवकांना विविध खेळांसाठी आवश्यक सोई सुविधा व मदत उपलब्ध करून देण्यास तत्पर असतील.याच येवल्यातून पुढील काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळातील खेळाडू आपल नाव कमावतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाण म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात अनेक महत्वाची विकास कामे आहे.राज्याच्या विकासात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.त्या येवले शहरात वायपीएल सारखी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे.या सारख्या स्पर्धा येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला अधिक बळकटी देतील.येवल्यात आगामी काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वरील खेळाडू निर्माण होऊन येवल्याचे नाव ते रोशन करतील.क्रीडा क्षेत्राला मंत्री छगन भुजबळ व माजी खा.समीर भुजबळ यांनी दिलेले बळ हे अतिशय महत्वपूर्ण असून यातून अनेक खेळाडू पुढे येतील असे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की,येवला हे पैठणी उद्योगासाठी जगभरात ओळखले जाणारे शहर आहे.येथील कामगारांनी आपली कला अतिशय प्रामाणिकपणे जपली असून येवल्याची ओळख जगभरात पोहोचविली आहे. आज या ठिकाणी त्याच कलाकारांनी बनविलेला फेटा आणि शाल देऊन माझा सन्मान करण्यात आला त्याचा मला विशेष आनंद आहे.येवल्याची ही ओळख टिकवून ठेवणाऱ्या या सर्व पैठणी विणकर आणि कामगारांना सलाम करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.आयपीएलच्या धर्तीवर आयोजित या स्पर्धेला दि.२९ मार्च रोजी भव्य प्रारंभ झाला होता.संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट नियोजन, दर्जेदार मैदान व्यवस्था व खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे येवला शहरासह संपूर्ण तालुक्यात या स्पर्धेची प्रचंड चर्चा रंगली होती. स्पर्धेत येवला मतदारसंघातील एकूण १६ संघांनी सहभाग नोंदविला होता.अंतिम सामन्यात शिवनेरी चॅलेंजर्स लासलगाव येवला मास्टर्स या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात रंगलेल्या या सामन्याने शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवली.यावेळी मंत्री छगन भुजबळ व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाण,माजी खा.समीर भुजबळ,आ.पंकज भुजबळ यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला.
असे आहेत विजेते संघ.
प्रथम -शिवनेरी चॅलेंजर्स लासलगाव
(१,११,१११/-) ट्रॉफी
द्वितीय - येवला मास्टर्स
(७७,७७७/-) ट्रॉफी
तृतीय - समता स्ट्राईकर्स अंदरसुल (५५,५५५/-)
चतुर्थ - एव्हरग्रीन ११
(३३,३३३/-)
मॅन ऑफ दि सिरीज - गोपाळ ठाकरे (लासलगाव) मोटारसायकल
सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत–जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आर जे लाइव्ह कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
या समारोप सोहळ्याचे खास आकर्षण ठरला तो सारेगमप फेम गायक रोहित राऊत व जुईली जोगळेकर यांच्या ‘RJ Live’ संगीत कार्यक्रमाचा. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले व संपूर्ण मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. येवलेकरांनी या सोहळ्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा