अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ’ उपक्रमास सुरुवात; विशेष हर्निया पॅकेजचेही लोकार्पण

नाशिक :- अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे हर्निया या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ’या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.उपक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ GI सर्जन डॉ.संदीप सबनीस करत असून,त्यांच्या सर्जिकल टीममध्ये डॉ. प्रखर गुप्ता,डॉ.उर्विक पाटील तसेच संपूर्ण GI सर्जरी टीम सहभागी आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून हर्नियाचे लवकर निदान, आधुनिक उपचारपद्धती आणि सुरक्षित शस्त्रक्रिया याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.हर्निया हा पोटाच्या स्नायूंमध्ये निर्माण झालेल्या कमकुवत भागामुळे होणारा आजार असून, वेळेवर उपचार न केल्यास तो गंभीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर या विशेष महिन्यात रुग्णांना तज्ज्ञ सल्लामसलत, तपासण्या आणि अत्याधुनिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.याच निमित्ताने रुग्णांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष हर्निया केअर पॅकेज देखील सुरू करण्यात येत आहे. या पॅकेजअंतर्गत तज्ज्ञ सल्लामसलत व USG (अल्ट्रासोनोग्राफी) तपासणी अवघ्या ₹४९९ मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे रुग्णांना हर्नियाचे लवकर निदान करणे अधिक सुलभ होणार आहे.तसेच, या उपक्रमांतर्गत हर्नियाची कोणतीही शस्त्रक्रिया जास्तीत जास्त ₹१,००,००० पर्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.याबाबत बोलताना वरिष्ठ GI सर्जन डॉ. संदीप सबनीस म्हणाले,“हर्निया हा उपचारक्षम आजार आहे,परंतु अनेक वेळा रुग्ण उशिरा येतात.लवकर निदान आणि योग्य शस्त्रक्रिया केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही रुग्णांना जागरूक करणे आणि त्यांना परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”यावेळी हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,“रुग्णांना तज्ज्ञ सेवा आणि आधुनिक उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ’ आणि विशेष पॅकेजच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना वेळेवर निदान व उपचार मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमीच रुग्ण-केंद्रित आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम हर्नियाबाबत जागरूकता वाढवण्यासोबतच रुग्णांना योग्य वेळी निदान आणि प्रभावी उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी