भाजपचे उपायुक्त मोनिका राऊत यांना निवेदन: सीसीटीव्ही गस्त वाढवा,नाशिकमधील आयटी कंपन्या सुरक्षित करा!

#breaking news#latest news #Maharashtra #Nashik crime#BJP Nashik #Nashik city police #Nashik 


नाशिक : शहरातील आयटी कंपनीच्या आडून सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचार,लैंगिक शोषण,धर्मांतराचा दबाव तसेच परिसरातील वाढत्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर प्रकारांविरोधात भाजप आक्रमक झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नाशिक महानगरचे अध्यक्ष सुनील केदार,यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.सदर निवेदनात आयटी कंपनी प्रकरणातील गंभीर बाबींचा उल्लेख करत,फरार आरोपींना तात्काळ अटक करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी करण्यात आली.महिलांवर झालेल्या अत्याचारांबाबत कठोर कारवाई करावी तसेच संबंधित कंपनीची सखोल चौकशी करून आवश्यक असल्यास ती सील करण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय शहरातील सर्व आयटी कंपन्या व कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांची पोलीस चारित्र्य पडताळणी (Police Verification) बंधनकारक करावी,तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही तात्काळ पडताळणी करावी,अशीही मागणी करण्यात आली.शिष्टमंडळाने अशोका हॉस्पिटल परिसरासह इतर भागांतील अतिक्रमण आणि अनियंत्रित पार्किंगचा प्रश्नही उपस्थित केला. सायकल ट्रॅक व सार्वजनिक जागांवर दारू पिणे, गोंधळ घालणे आणि बेफाम वेगाने वाहने चालविणे या प्रकारांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,अशी मागणी करण्यात आली.तसेच अशोका हॉस्पिटल परिसरातील अनियोजित वाहनतळ हटवून नियोजित पार्किंग व्यवस्था करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि नियमित गस्त वाढवावी,अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.भाजपच्या या शिष्टमंडळात शहरातील विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी निवेदनाची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, सुनील देसाई सरचिटणीस,भाजपा नाशिक महानगर,ॲड. श्याम बडोदे गटनेता तथा सरचिटणीस-भाजपा नाशिक महानगर नगरसेवक चंद्रकांत खोडे,दिपाली कुलकर्णी,ॲड. अजिंक्य साने,मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सुनील खोडे,प्रवीण भाटे,अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा नाशिक महानगर,निखिल खोडे,प्रकाश ननावरे,सचिन कुलकर्णी,बबलू परदेशी.आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी