ना.रोड परिसरातील विकास कामांचा प्रशासनातर्फे आढावा आयुक्तांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित

#India Maharashtra #nashik city #NMC #latest news #Kumbh Mela2027 #maharastra #breaking news 
नांदूर–दसक स्मशानभूमी व परिसर विकास कामांचा प्रशासनातर्फे आढावा

(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नांदूर–दसक स्मशानभूमी परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणी दरम्यान भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेसह मोठ्या प्रमाणातील गर्दी व्यवस्थापनाचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे.या अंतर्गत स्मशानभूमी क्षेत्राचे रुंदीकरण करण्यात येणार असून,संपूर्ण परिसर अधिक प्रशस्त व सुव्यवस्थित केला जाणार आहे.तसेच,संबंधित प्लॅटफॉर्मचे समतलीकरण करून तो अधिक सक्षम व सुरक्षित करण्यात येईल,ज्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांना सुलभतेने प्रवेश व वापर करता येईल.परिसरातील पादचारी दळणवळण सुलभ व सुरक्षित व्हावे यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार असून,गर्दीच्या काळातही सुरळीत व्यवस्थापन सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.या पाहणी वेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व पोलीस कर्मचारी, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आणि अन्य अधिकारी,महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून निर्धारित वेळेत ही कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे.सिंहस्थ कुंभमेळा दरम्यान येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी ही विकासकामे अत्यंत महत्त्वाची असून, प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी