इंदिरानगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन

नाशिक  :- इंदिरानगर परिसरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगरच्या वतीने नाशिक महानगरपालिकेकडे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन उपायुक्त सुवर्ण दखने यांना देण्यात आले.यावेळी उपायुक्त सुवर्ण दखने यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन भाजपा शिष्टमंडळाला दिले.इंदिरानगर परिसरात वाढलेल्या अनधिकृत बांधकामे,हातगाड्या, पानटपऱ्या व अव्यवस्थित पार्किंगमुळे वाहतूक कोंडी,अपघातांचा धोका तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतःअशोका हॉस्पिटल परिसर व अशोका मार्ग येथे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार,सुनील देसाई सरचिटणीस,भाजपा नाशिक महानगर, ॲड.श्याम बडोदे गटनेता तथा सरचिटणीस-भाजपा नाशिक महानगर नगरसेवक चंद्रकांत खोडे,दिपाली कुलकर्णी,ॲड.अजिंक्य साने,मा.नगरसेवक यशवंत निकुळे,सुनील खोडे,प्रवीण भाटे,अध्यक्ष युवा मोर्चा भाजपा नाशिक महानगर,निखिल खोडे,सचिन कुलकर्णी,बबलू परदेशी प्रकाश ननावरे,आदी उपस्थित होते.प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलून इंदिरानगर परिसर अतिक्रमणमुक्त करावा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी