विद्यार्थ्यांनी भविष्यात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे - मिता चौधरी

नाशिक :- “विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगातून शिकावे, समस्या ओळखून त्यावर उपाय शोधावेत आणि भविष्यात देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी केले.
नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग,सिमेन्स कंपनी व ISPF (Innovation and Science Promotion Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने “हॅकथॉन चॅलेंज २०२५-२६”स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी बोलतांना मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉ.मिता चौधरी यांनी सांगितले की,या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग ठेवण्याचे व विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो,असे त्यांनी नमूद करून सिमेन्स कंपनीच्या सहकार्याबद्दल विशेष कौतुक केले.शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून नाशिक महानगरपालिकेच्या निवडक २४ शाळांमध्ये “जिज्ञासा प्रकल्प” राबविण्यात येत आहे.या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने STEM किट,संगणक,विविध विज्ञान साहित्य उपलब्ध करून देण्यात येते.तसेच शाळास्तरावर व महापालिकास्तरावर विज्ञान प्रदर्शन,प्रकल्प सादरीकरणे व पालक मेळावे यांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण दिले जाते.या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांमधील नवोन्मेषी विचारांना चालना देण्यासाठी व त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी शहरस्तरीय हॅकथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे,सर्जनशीलता वाढविणे,तर्कशक्ती बळकट करणे तसेच समस्यांचे समाधान शोधण्याची क्षमता विकसित करणे हा होता.स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष “लाईव्ह प्रोजेक्ट”तयार करण्याची संधी देण्यात आली.सहभागी विद्यार्थ्यांना“ट्रेनव्हील”तयार करण्यासाठी आवश्यक किट देण्यात आली होती.या किटच्या आधारे विद्यार्थ्यांनी चार टप्प्यांमध्ये आपले प्रकल्प सादर केले.दिलेल्या साहित्याचा प्रभावी व तर्कशुद्ध वापर करून विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केले.या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची कल्पकता,विश्लेषणात्मक विचारसरणी व टीमवर्क यांचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळाला.या स्पर्धेत महानगरपालिकेतील एकूण २३ शाळांनी सहभाग नोंदवला असून सुमारे ११० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व आत्मविश्वासाने आपले प्रकल्प सादर करत परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.स्पर्धेतील विजेते स्पर्धेच्या प्राथमिक विभागात मनपा प्राथमिक शाळा शिवाजीनगर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.मनपा प्राथमिक शाळा सातपूर कॉलनी यांनी प्रथम क्रमांक,तर मनपा प्राथमिक शाळा कामटवाडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.तसेच माध्यमिक विभागात मनपा उर्दू माध्यमिक विद्यालय वडाळा यांनी विजेतेपद मिळविले.मनपा माध्यमिक विद्यालय सातपूर कॉलनी यांनी प्रथम क्रमांक,तर मनपा माध्यमिक विद्यालय अंबड यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक व उपयुक्त बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी मिनी अल्ट्रा HD प्रोजेक्टर व पॉवर बँक,द्वितीय क्रमांकासाठी स्मार्ट नोटपॅड व पॉवर बँक,तसेच तृतीय क्रमांकासाठी मिनी थर्मल प्रिंटर व पॉवर बँक देण्यात आले.या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्टडी टेबल देऊन गौरविण्यात आले.तसेच शिक्षकांनाही त्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रोत्साहनपर भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.उपक्रम यशस्वीतेसाठी मनपा कार्यक्रम समन्वयक प्रल्हाद हंकारे,सिमेन्स कंपनीचे शिवा सर,तसेच शिक्षकवृंद,परीक्षक म्हणून लाभलेले महाविद्यालयीन प्राध्यापक श्रीम.नम्रता आणि ISPF टीम, जिज्ञासा टीम श्रीम.प्रिया ठाकूर, श्रीम.दीक्षा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान मिळाले.यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमशीलता,वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मविश्वास वाढीस लागतो.भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे,अशी अपेक्षा डॉ.मिता चौधरी,प्रशासनाधिकारी मनपा शिक्षण विभाग यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी