येवल्यात सुसज्ज क्रिकेट स्टेडियम उभारणार - मंत्री छगन भुजबळ
सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत–जुईली जोगळेकर यांच्या सुरेल आर जे लाइव्ह कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध. येवला प्रिमीयर लिग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे भुजबळ ब्रिगेड आयोजित वायपीएलच्या महाविजेते पदी शिवनेरी चॅलेंजर्स लासलगाव तर उपविजेते पदी येवला मास्टर्स माजी खा.समीर भुजबळ व त्यांची टीम येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ देईल - मंत्री छगन भुजबळ येवला,दि.१० एप्रिल:- येवला शहरात दोनशे वर्षांहून अधिक जुने टेनिस कोर्ट असून येवल्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठी परंपरा आणि इतिहास आहे.आगामी काळात येवल्याच्या या क्रीडा क्षेत्राला अधिक बळ देण्याचे काम समीर भुजबळ आणि त्यांची टीम करेल. या येवला शहरात सुसज्ज असे क्रिकेट स्टेडियम उभारले जाईल असे प्रतिपादन प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेड आयोजित येवला प्रीमियर लीग २०२६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचा महाअंतिम सामना व समारोप सोहळा राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,आंतरराष्ट्रीय क्रिक...