नाशिक :- शिक्षकाच्या सेवानिवृत्तीनंतर त्याला आपल्या यशस्वी झालेल्या किमान दहा विद्यार्थ्यांची नावे ठामपणे अभिमानाने सांगता आली पाहिजे. की हा विद्यार्थी यशस्वी झाला आणि त्याच्या यशामागे माझा हात होता.अशी निष्ठा आणि समर्पण शिक्षकांमध्ये असणे गरजेचे आहे. यशस्वी विद्यार्थी हीच शिक्षकाच्या संपूर्ण आयुष्याची खरी कमाई आणि पुंजी असते,असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते व विचारवंत प्रा.गणेश शिंदे यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शनिवारी (दि.५) दुपारी गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित सेवानिवृत्त सेवक सत्कार आणि गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले होते.यावेळी व्यासपीठावर मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,संचालक ॲड. सयाजीराव गायकवाड, ॲड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, अमित बोरसे, डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, नंदकुमार बनकर, विजय पगार,रमेश पिंगळे, शालन सोनवणे,सी. डी.शिंदे, निवृत्त मुख्याध्यापक हांडगे सर, एस.एम.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाजगीत सादर केले.उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडत कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश सांगितला.यावेळी प्रा.गणेश शिंदे म्हणाले, बदलत्या काळात शिक्षकांनी रोज नवीन ज्ञान आत्मसात केले पाहिजे. ज्ञानाच्या जोरावरच शिक्षकाचा रुबाब कायम राहतो.मागच्या पिढीकडे कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक होत्या आणि वेतनही मर्यादित होते.आज काळ बदलला आहे,मात्र या बदलत्या काळात घरांमधील व समाजातील परस्पर संवाद कमी झाला आहे.हा संवाद पुन्हा वाढवणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. आजच्या काळात समाजाला योग्य दिशा देण्याची मोठी गरज आहे. योग्य ठिकाणी'नाही'म्हणता आले पाहिजे.ज्याला कुठे‘नाही’म्हणायचे जमले,तो आयुष्यात यशस्वी होतो.शिक्षकांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी‘आज आपण नवीन काय शिकलो?'हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.सातत्यपूर्ण शिकण्यानेच व्यक्तिमत्त्व समृद्ध होते.शिक्षकांनी समाजाचे नेतृत्व करत नव्या पिढीला योग्य दिशा दाखवावी,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.ॲड.नितीन ठाकरे म्हणाले,मविप्र संस्थेने आजवर लाखो विद्यार्थी घडविले.आज अनेक विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात तर काही विद्यार्थी परदेशातदेखील आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. यामागे संस्थेतील आजी-माजी शिक्षक,प्राध्यापकांचे महत्वपूर्ण योगदान आहे.विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय शिक्षकांनाच असल्याचेही ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले. मविप्रतर्फे सुरु करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आजवर ७ हजार बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.मविप्र
सभासदांबरोबरच सेवानिवृत्त सेवकांनीदेखील नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मविप्र पत्रिकेच्या रोजगार विशेषांकामधील अर्ज भरून द्यावा,त्यांच्या कुटुंबातील सदस्यालादेखील चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल,असे आश्वासन त्यांनी दिले.शिक्षकांनी केलेल्या अहोरात्र प्रयत्नांचे आणि अथांग मेहनतीचे फलित म्हणजेच आज त्यांना मिळणारे पुरस्कार व सन्मान आहेत,असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.अध्यक्षीय मनोगतात डॉ.सुनील ढिकले यांनी शिक्षण क्षेत्रातील वाढत्या आव्हानांवर आणि जबाबदारीवर प्रकाश टाकला. आदर्श शिक्षक कसा असावा,हे त्यांनी विविध समर्पक उदाहरणांद्वारे पटवून देत मार्गदर्शन केले.महाराष्ट्रात वारे गुरुजी,गावित सर,कुंदा बच्छाव यांसारखे अनेक उपक्रमशील आणि आदर्श शिक्षक आहेत.त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.आज समाजाला शिक्षणक्षेत्राकडून खूप अपेक्षा आहेत.मविप्र संस्थेतदेखील अनेक आदर्श शिक्षक असून,मविप्र संस्थेतील शिक्षकांनाही राष्ट्रपती पुरस्कार मिळावेत,अशी अपेक्षा डॉ.ढिकले यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवकांसह विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. चिटणीस दिलीप दळवी यांनी आभार मानले.कार्यक्रमास मविप्रचे सभासद,शिक्षणाधिकारी,विविध शाखांमधील प्राचार्य,मुख्याध्यापक, प्राध्यापक,शिक्षक,सेवक,विद्यार्थी व पालक मोठ्या यांचा झाला सन्मान.या सोहळ्यात मविप्र संस्थेतून १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या काळात सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, उपशिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी अशा २०० सेवकांचा तसेच, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अव्वल आलेल्या विविध शाखांमधील ५० गुणवंत विद्यार्थी आणि राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदके मिळविणाऱ्या २०० खेळाडूंचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.मविप्रच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित सेवानिवृत्त सेवक सत्कार आणि गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना युवा व्याख्याते प्रा. गणेश शिंदे.व्यासपीठावर मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,संचालक ॲड.सयाजीराव गायकवाड,ॲड.लक्ष्मण लांडगे,शिवाजी गडाख,अमित बोरसे,डॉ.प्रसाद सोनवणे, ॲड.रमेशचंद्र बच्छाव,नंदकुमार बनकर,विजय पगार,रमेश पिंगळे, शालन सोनवणे,सी.डी.शिंदे, निवृत्त मुख्याध्यापक हांडगे सर,एस.एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या