नाशिक :- श्री कालिका देवी मंदिर संस्थांच्या वतीने गंगाराम गोपाळराव पाटील (कोठावळे) गुरुजी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण आमदार गोकुळ गीते यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आमदार गिते म्हणाले की कालिका देवी संस्थान विविध उपक्रम राबवत असल्याने संस्थानचे कार्य निश्चितच प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे असे उदगार गोकुळ गीते यांनी काढले.
या सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सी आर पाटील संचालक सिम्बॉयसिस स्कूल हे होते.अध्यक्षस्थानी कालिका मंदिर देवस्थान अध्यक्ष केशवराव अण्णासाहेब पाटील,हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सेक्रेटरी डॉ.प्रतापराव कोठावळे यांनी केले पाहुण्यांचे स्वागत अशोक दुधारे,यांनी केले पाहुण्यांचे आभार सुनील बिरारी, यांनी मानले सूत्रसंचालन संयोगिता भवर,यांनी केले.याप्रसंगी संस्थानचे पदाधिकारी सुभाष तळाजिया,किशोर कोठावळे,आबासाहेब पवार,विशाल पवार,सतीश कोठावळे,दत्ता काका पाटील,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आमदार गोकुळ गिते यांच्या हस्ते वर्षा मोराडे,बाजीराव वाघ,सरिता देवरे,विशाल सावंत,संदीप कोठावदे,अश्विनी पवार,अश्विनी भवरे,बी बी ढिकले,शशिकांत मोरे,अनिल वाघ,मनोज कुमार शिंदे,नंदा कापडणीस,केवल वाघ,सुशीला भांगरे,हरिराम गावित सुनंदा गावंडे,दिलीप झुरडे पल्लवी भामरे,लक्ष्मण शेंडगे,वाघरवाघ हरी,भागवत गाडेकर,सुधाकर बोरसे,शिंदे गीतल,जगदीश डिंगे,प्रताप काळे,सिताराम निकम,चौधरी रतन चौधरी,दीपक देवरे,बाळासाहेब नागरे,विलास दरगुडे,बाळासाहेब वावळे,शैलेश पाटोळे,विवेक पाटील,सुनील काळे,नीलिमा निकम ,सूर्यकांत शिरोडे,लक्ष्मण सानप,भाऊसाहेब भदाणे,दत्तात्रेय अहिरे,चित्रकला देशमुख,सुवर्णा थोरात,सतीश लिंडाईत,दिनेश कराड,सुनील पाटील,वासुदेव बधान,मनीषा सोनवणे,भारती बधान,रणाते सुनिता,सुवर्णा कापडणीस,श्यामकांत बोरसे,ज्योती भोये,यांना गौरविण्यात आले.यावेळी मनोज वाकचौरे,राम पाटील,भरत पाटील,दीपिका,पाटील,कांचन पाटील,निवेदिता पाटील,सुनील गुळवे,अमोल गोसावी,सुनील सोनार,मनोहर शिंदे,पवन पवार,आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या