नाशिक :- श्री कालिका देवी मंदिर संस्थान च्या वतीने कै गंगाराम गोपाळराव पाटील (कोठावळे) गुरुजी यांच्या स्मरणार्थ आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार आदिवासी सेवा समिती संचलित के बी एच विद्यालय वडाळा शाळेचे मुख्याध्यापक सतीश लिंडाईत यांना विधान परिषदेचे आमदार गोकुळ गिते,सिंबायोसिस स्कूल चे संचालक सी आर पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव पाटील संस्थेचे सेक्रेटरी डॉ प्रतापराव कोठावळे,यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मुख्याध्यापक
सतीश लिंडाईत यांना आपल्या ३४ वर्षाच्या सेवेत त्यांना जि.प. नाशिक - विशेष योग्यता पुरस्कार - जिल्हास्तरीय सांस्कृतिक - शैक्षणिक विकास मंडळ,अकोला - राज्यस्तरीय,ज्ञानसुधा शिक्षण परिषद जळगावचा -राज्यस्तरीय
,ज्ञानगंगा कला फेस्टीवल -
जिल्हास्तरीय ,कलाभारती बालकला संस्था- औरंगाबाद - राज्यस्तरीय,कलाध्यापक महामंडळ राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले असून,कलाशिक्षक म्हणून संस्थेच्या बोलक्या भिंती रेखाचित्रणा बरोबरच विविध उपक्रम समारंभ सजावट,आयोजन,नियोजन जबाबदारी समर्थपने पार पाडून संस्थेत नावलौकिक मिळवला असून मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्य पूर्ण प्रयत्न तून शाळेचा झालेला विकास या कार्याची दखल घेऊन श्री कालिका मंदिर संस्थान वतीने शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सन्मानाबद्दल आदिवासी सेवा समिती व महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी मंत्री समाजश्री डॉ. प्रशांत दादा हिरे, संस्थेच्या कोषाध्यक्षा मा.डॉ.स्मिताताई हिरे,संस्था समन्वयक डॉ.अपूर्व हिरे,संस्था विश्वस्त डॉ.अद्वय आबा हिरे-पाटील,विश्वस्त तथा सांस्कृतिक प्रमुख.संपदा हिरे,नगरसेविका व संस्थेच्या विश्वस्त.डॉ.योगिता हिरे,महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे उपाध्यक्ष हरीश आडके सहसचिव राजेशजी शिंदे,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुंदे सर व बी.एस.यादव,शिक्षण विभाग सहसमन्वयक विजय निकम,संस्थेचे सर्व पदाधिकारी,के.बी.एच.विद्यालय वडाळा,नाशिक-6 या शाळेचे पर्यवेक्षक महेंद्र बाविस्कर,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,शाळेच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या