मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी महेश चंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी संपन्न

मुंबई,दि.९ :- महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी बुधवारी लोकभवन,मुंबई येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभात अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. शपथ प्रदान केल्यानंतर राज्यपाल, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन न्या.त्रिपाठी यांचे अभिनंदन केले.यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी न्या.महेश चंद्र त्रिपाठी यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना व अधिपत्र वाचून दाखवली.राष्ट्रगान वंदेमातरम,राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली तर वंदेमातरम व राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे,विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर,उपसभापती सचिन अहिर,मंत्री छगन भुजबळ, मंत्री मंगल प्रभात लोढा,मुंबईच्या महापौर रितू तावडे,मुंबई उच्च न्यायालयातील सन्यमाननीय न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती उपस्थित होते.मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती मोहित शाह यांसह अनेक मान्यवर या समारंभास उपस्थित होते.न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती पद रिक्त झाले होते.न्यायमूर्ती रवींद्र घुगे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या