भंडारा उत्सवाने दुमदुमले भरवीर खुर्द; बाल भैरवनाथाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची अलोट गर्दी!


इगतपुरी :- इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथे श्रावण महिन्यातील चौथ्या शनिवारचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे याही वर्षी बाल भैरवनाथ भंडारा उत्सव २०२६ अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या धार्मिक सोहळ्याला परिसरातील व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती.धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
उत्सवानिमित्त सकाळी ८ ते १० या वेळेत बाल भैरवनाथ मंदिरात विधिवत अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली.

यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत गावातून बाल भैरवनाथाच्या मुखवट्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजर आणि जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते.सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत महाप्रसादाचे (भोजन) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.भरवीर गावातील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे पोलीस पाटील रमेश टोचे उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवर्य परसराम पांडे,यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण उत्सवाचे  नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू बांडे,नवनाथ बांडे,भाऊसाहेब बांडे,तानाजी बांडे, शंकर दौंडे,सोमनाथ टोचे,मुरलीधर बांडे यांच्यासह सर्व ग्रामस्थ व तरुण मंडळाने विशेष परिश्रम घेतले.या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बाहेरील गावातून आलेले वाघे-मुरळी यांनी आपली कला सादर करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले आणि उत्सवाची शोभा वाढवली.

 तसेच पंचक्रोशीतील नामवंत कलावंत व गायन पार्टीचे दिनकर घोरपडे (भंडारदरा वाडी),अर्जुन दिनकर (भरवीर बुद्रुक),गंगुबाई लगड (नाशिक रोड),अर्जुन हुलूळे (पाथर्डी) आणि उत्तम जाधव (पिंपळगाव खांब) यांनी आपल्या भजनांनी व गायनाने कार्यक्रमात रंगत आणली.या संपूर्ण सोहळ्याला भरवीर खुर्द गावातील तसेच पंचक्रोशीतील महिला भगिनी,पुरुष व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या