गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करतानाच समाज उपयोगी,सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा - पोलीस उपायुक्त किशोर काळे

अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समितीची बैठक संपन्न 


नाशिक :- अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित शांतता समितीची बैठक दि०४-०९-२०२६ रोजी महेश भवन येथे संपन्न झाली.यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे,साहाय्यक पोलीस आयुक्त सचीन बारी,अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ,इंदीरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करांडे,मनपा विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उप अभियंता नगरसेविका,नगरसेवक विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित शांतता समिती सदस्य तसेच गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते यांना उपायुक्त किशोर काळे,साहाय्यक पोलीस आयुक्त सचीन बारी,पोलीस निरीक्षक मनोहर करांडे,पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी गणेशोत्सव साजरा करत असतांनाच मोठ्या सक्षम गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सुचना केल्या,तसेच सोन्याचे दागिने परिधान करतांना महिलांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार एक गणपती एक पोलीस अंमलदार मदतीस,होमगार्ड गणेश मंडळांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे.अतिरिक्त मदत लागल्यास तात्काळ पोलीसांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले,उपायुक्त काळे यांनी याप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करतानाच सामाजिक कार्यात सहभागी होत समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.नाशिक महानगरपालिकेचे विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या खड्यांच्या प्रश्नावर गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले आहे.महावितरणच्या वतीने उपस्थित अधिकारी यांनी गणेशोत्सव मंडळांचा तात्काळ वीज पुरवठा जोडण्यात येणार असून ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विनाविलंब कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या