अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ‘ऑडिओमेट्री सर्व्हिसेस अँड स्पीच थेरपी केअर’चे उद्घाटन


आधुनिक श्रवण तपासणी व स्पीच थेरपी सुविधा आता नाशिकमध्ये एकाच छताखाली
नाशिक :- श्रवणदोषाचे अचूक निदान, वेळेवर उपचार तसेच बोलणे आणि संवादाशी संबंधित अडचणींवर योग्य मार्गदर्शन मिळावे,या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिकच्या ईएनटी विभागात‘ऑडिओमेट्री सर्व्हिसेस अँड स्पीच थेरपी केअर’या आधुनिक सुविधेचे आज उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे अत्याधुनिक श्रवण तपासणी तसेच स्पीच आणि लँग्वेज थेरपी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.ही सुविधा ईएनटी शल्यचिकित्सक डॉ. पंकज भट आणि क्लिनिकल ऑडिओलॉजिस्ट डॉ.सोहन चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार आहे.श्रवणक्षमता कमी होणे,कानाशी संबंधित समस्या, लहान मुलांमधील श्रवणदोष, बोलण्यास उशीर होणे,उच्चार स्पष्ट न होणे तसेच इतर स्पीच व कम्युनिकेशनशी संबंधित अडचणींचे मूल्यांकन आणि आवश्यक थेरपी येथे उपलब्ध होणार आहे.

“श्रवणदोषाचे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे”- डॉ. पंकज भट

डॉ.पंकज भट म्हणाले,“विशेषतः लहान मुलांमध्ये श्रवणदोष वेळेत ओळखला नाही तर त्याचा परिणाम त्यांच्या बोलण्याच्या,भाषिक आणि शैक्षणिक विकासावर होऊ शकतो. त्यामुळे मुलाला आवाजाला प्रतिसाद न देणे,बोलण्यास उशीर होणे किंवा उच्चार स्पष्ट न होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास पालकांनी वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रौढांमध्येही श्रवणक्षमता कमी होण्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तपासणी व उपचार घेणे आवश्यक आहे.”

“योग्य श्रवण तपासणीमुळे अचूक मूल्यमापन शक्य” – डॉ. सोहन चौहान

डॉ.सोहन चौहान म्हणाले,“प्रत्येक रुग्णामध्ये श्रवणदोषाची तीव्रता आणि त्याचा संवादावर होणारा परिणाम वेगळा असतो.त्यामुळे योग्य ऑडिओलॉजिकल मूल्यांकन महत्त्वाचे आहे.ऑडिओमेट्रीच्या माध्यमातून श्रवणक्षमता अचूकपणे तपासून त्यानुसार पुढील उपचार, श्रवण पुनर्वसन किंवा स्पीच थेरपीची आवश्यकता निश्चित करता येते. विशेषतः मुलांमध्ये समस्या लवकर ओळखून थेरपी सुरू केल्यास त्यांच्या संवादकौशल्याच्या विकासाला मोठी मदत होते.”

“आधुनिक Hearing आणि Speech Care नाशिकमध्ये उपलब्ध” – अनुप त्रिपाठी

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी म्हणाले, “रुग्णांना आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा नाशिकमध्येच उपलब्ध करून देणे हे आमचे सातत्यपूर्ण ध्येय आहे.या नव्या सुविधेमुळे श्रवण आणि संवादाशी संबंधित समस्यांसाठी अधिक समन्वयित सेवा उपलब्ध होणार आहे.लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील रुग्णांना याचा लाभ मिळेल.या उद्घाटनप्रसंगी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सर्व न्यूरोलॉजिस्ट,तसेच नाशिक शहरातील फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते.त्यांनी या नव्या सुविधेचे स्वागत करून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या या नव्या सुविधेमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना ENT,Hearing आणि Speech Care क्षेत्रातील आधुनिक व एकात्मिक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या