सिन्नर - सकल मराठा परिवारतर्फे‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम

(प्रतिनीधी - समाधान शिरसाठ)
सिन्नर :- सकल मराठा परिवार सिन्नर यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंढी ता.सिन्नर या ठिकाणी‘एक राखी सैनिकांसाठी’हा उपक्रम साजरा करण्यात आला.हा उपक्रम सकल मराठा परिवार गत चार वर्षांपासून राबवत आहे. परिवाराच्या वतीने पाठवलेल्या राखी भेटल्यानंतर सैनिकांकडून आभार पत्र येते व यात अनेक सैनिक बांधव आपल्या भावना व्यक्त करतात.यावेळी समन्वयक ज्ञानेश्वर शिंदे यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.आपण सैनिकांपर्यंत पोहोचू शकत नाही.जे सैनिक देशाचे रक्षण करतात अशा सैनिकांना आपण राखी व भेटकार्ड पाठविल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे. तसेच जे बांधव दिवसरात्र सीमेवर सेवा करत आपल्यासाठी उभे असतात,त्यांच्यामुळे आपले सण, उत्सव जोराने साजरे होतात.परंतु, त्यांना त्यात सहभागी होता येत नाही.आपल्या समाजाचे त्यांच्याप्रति काही देणे लागते म्हणून सकल मराठा महिला परिवाराच्या वतीने दरवर्षी हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला जातो. यावेळी २० ठिकाणी प्रतिनिधीक स्वरूपात राखी, ग्रीटिंग व मेसेज कार्ड पाठवण्यात येत आहेत.ज्यावेळी या राख्या सीमेमर सैनिक बांधवांना भेटतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही तसेच त्यांच्याकडून ग्रुपच्या बहिणींना आभार पत्र पण येते. या उपक्रमासाठी इ. १ ली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तसेच महिला शिक्षिकांनीसुद्धा अतिशय आकर्षक राख्या,भेटकार्ड बनविले होते.या भेटकार्डवर अतिशय समर्पक असे घोषवाक्य लिहिलेली होती. सैनिकांनो तुमच्यासाठी,अशा भारावलेल्या भावनांनी सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी राखी पाठविण्याच्या कार्यात दरवर्षी अग्रेसर असते.हा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातून केला जातो.या उपक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दहिभाते सर तसेच शिक्षिका गिते मॅडम यांचे सहकार्य लाभले.यावेळी सकल मराठा परिवाराचे समन्वयक दिनेश मेदगे,ज्ञानेश्वर शिंदे,प्रमोद घोलप,सुनंदा निंबाळकर,जगदीश उगले व डॉ.विकास रामहारी मेदगे तसेच संपूर्ण सकल मराठा परिवार टीम उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या