राजीव नगर येथे एसटी महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; लाभ घेण्याचे आवाहन


नाशिक :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा, स्मार्ट आणि सुरक्षित करण्यासाठी 'एसटीचे एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. सवलत योजनेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.या शिबिराचे आयोजन माजी सभागृह नेते नाशिक महापालिका सतीश (बापू) सोनवणे (भगवती चौक,राजीव नगर,नाशिक) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराची माहिती (दिनांक आणि वेळ):

 दिनांक: १७/०८/२०२६ ते २०/०८/२०२६ पर्यंत
 वेळ: सकाळी ११:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत

------------------------------ या योजनांचे मिळणार फायदे:
१. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना: ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (स्त्री व पुरुष) एसटी प्रवासात १००% तिकीट माफ (मोफत प्रवास).
२. ज्येष्ठ नागरिक योजना: ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (स्त्री व पुरुष) एसटी प्रवासात ५०% तिकीट माफ.
३. महिला सन्मान योजना: १२ वर्षांवरील सर्व महिलांना एसटी प्रवासात ५०% तिकीट माफ.
आवश्यक कागदपत्रे आणि नियम:

आधार कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे.
मोबाईल नंबर (OTP साठी सक्रिय असलेला फोन सोबत ठेवावा).
ज्या व्यक्तीला कार्ड हवे आहे, त्यांनी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे.

कार्ड वितरण: नोंदणी केल्यानंतर ३० दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे 'NCMC स्मार्ट कार्ड' मिळेल.
रिचार्ज सुविधा: हे कार्ड तुम्ही UPI किंवा कोणत्याही मोबाईल ॲपद्वारे सहज रिचार्ज करू शकता.नाशिकमधील राजीव नगर आणि परिसरातील पात्र नागरिकांनी,महिलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन सतीश बापू सोनवणे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या