नाशिकमध्ये खळबळजनक घटना; मोबाईल शूटिंगच्या वादातून तरुणाची गच्चीवरून ढकलून हत्या,६ तासांत तिघांना बेड्या!


नाशिक :- मोबाईलमध्ये शूटिंग काढल्याच्या किरकोळ वादातून एका ३० वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून आणि घराच्या गच्चीवरून खाली ढकलून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिक जवळील विल्होळी गावात घडली होती.राहुल संजय सरकटे (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून,नाशिक तालुका पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत अवघ्या ६ तासांच्या आत तिन्ही मुख्य सं.आरोपींतांना ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास विल्होळी गावातील संघर्षनगर परिसरात हा प्रकार घडला.मयत राहुल सरकटे आणि आरोपी यांच्यात मोबाईल फोनमध्ये शूटिंग काढण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या भांडणात झाले.आरोपींतांनी रागाच्या भरात राहुल यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली.एवढ्यावरच न थांबता,त्यांनी राहुल यांना घराच्या गच्चीवरून थेट खाली ढकलून दिले.यात गंभीर जखमी झाल्याने राहुल यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर तिन्ही आरोपीत घटनास्थळावरून फरार झाले होते.
याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची तत्परता;६ तासांत आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य ओळखून तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असतानाच,प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेली माहिती आणि सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे आरोपींचा माग काढला.गुन्हा घडल्यापासून अवघ्या ६ तासांच्या आत पोलिसांनी त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी फाटा परिसरातून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.अटक करण्यात आलेल्या सं.आरोपींतांची नावे:
१) अजय रामदास गांगुर्डे (वय २२, रा. तळगाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक)
२) वैभव गोविंद मेंगाळ (वय २१, रा. दत्तनगर, अंबड, नाशिक)
३) दिपक एकनाथ पारधी (वय १९, रा. विल्होळी, ता. जि. नाशिक)
सध्या या तिन्ही सं.आरोपींतांना नाशिक तालुका पोलिसांनी अटक केली असून,पुढील तपास पोलीस अधिकारी आणि अंमलदार करत आहेत.किरकोळ कारणावरून झालेल्या या हत्येमुळे विल्होळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या