नाशिक - सकल मराठा परिवारतर्फे‘एक राखी सैनिकांसाठी’ उपक्रम


उपक्रमात विविध शाळांचा सहभाग
नाशिक :- सकल मराठा परिवार, नाशिक यांच्या वतीने व मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर मखमलाबाद, जनता विद्यालय गांधीनगर, मनपा शाळा ४९ पंचक,जनता विद्यालय पंचक या ठिकाणी‘एक राखी सैनिकांसाठी’हा उपक्रम साजरा करण्यात आला.हा उपक्रम सकल मराठा परिवार गत सात वर्षांपासून राबवत आहे. परिवाराच्या वतीने पाठवलेल्या राखी भेटल्यानंतर बटालियन्सकडून आभार पत्र येते व यात अनेक सैनिक बांधव आपल्या भावना व्यक्त करतात. 

यावेळी समन्वयक खंडू आहेर यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.आपण सैनिकांपर्यंत पोहोचू शकत नाही.जे सैनिक देशाचे रक्षण करतात अशा सैनिकांना आपण राखी व भेटकार्ड पाठविल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे.तसेच जे बांधव दिवसरात्र सीमेवर सेवा करत आपल्यासाठी उभे असतात, त्यांच्यामुळे आपले सण,उत्सव जोराने साजरे होतात.परंतु,त्यांना त्यात सहभागी होता येत नाही. आपल्या समाजाचे त्यांच्याप्रति काही देणे लागते म्हणून सकल मराठा महिला परिवाराच्या वतीने दरवर्षी हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबवला जातो.यावेळी २० ठिकाणी प्रतिनिधीक स्वरूपात राखी,ग्रीटिंग व मेसेज कार्ड पाठवण्यात येत.अशा उपक्रमांमधूनच पुढील पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढते असे मत व्यक्त केले.ज्यावेळी या राख्या सीमेमर सैनिक बांधवांना भेटतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही तसेच त्यांच्याकडून ग्रुपच्या बहिणींना आभार पत्र पण येते.या उपक्रमासाठी इ.१ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी तसेच महिला शिक्षिकांनीसुद्धा अतिशय आकर्षक राख्या,भेटकार्ड बनविले होते.या भेटकार्डवर अतिशय समर्पक असे घोषवाक्य लिहिलेली होती. सैनिकांनो तुमच्यासाठी,अशा भारावलेल्या भावनांनी सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी राखी पाठविण्याच्या कार्यात दरवर्षी अग्रेसर असते.हा उपक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातून केला जातो.या उपक्रमास अभिनव बालविकास मंदिर मखमलाबादचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे,जनता विद्यालय गांधीनगर पर्यवेक्षक कटाळे मॅडम, शायनिंग स्टार स्कूल च्या मुख्याध्यापिका व्यास मॅडम,जनता विद्यालय पंचकच्या मुख्याध्यापिका शैला उंडाळे,शाळा क्रमांक ४९ चे केंद्रप्रमुख गोपाळ वैरागी,शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,मुरंबी,ता. त्र्यंबकेश्वर,मुख्याध्यापक शीतल खंडे,अधीक्षक प्रभाकर शिंदे. सोनाली वाघ,संध्या ठाकरे,मोनाली वाजे,सुषमा थेटे,स्वाती राऊत, कांचन गोसावी,ज्योती काळोखे,गायत्री बनकर यांचे सहकार्य लाभले.यावेळी सकल मराठा परिवाराचे समन्वयक चैताली आहेर,स्नेहल काळे, सिंधुताई पगार,सिंधुताई पगार,वंदना डीडोरे,मोहिनी राव, प्रकाश बोराडे,प्रवीण देशमुख, कल्पेश बोराडे,कैलास देशमुख, संजय झारोळे,ओंकार राव तसेच संपूर्ण सकल मराठा परिवार टीम उपस्थित होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या