राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने चिंचवडला हिंदू साम्राज्य दिन उत्साहात संपन्न


चिंचवड :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संत गाडगेबाबा शाखा केशवनगर चिंचवड येथे हिंदू साम्राज्य दिन उत्साहात संपन्न! 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त हिंदू साम्राज्य दिन केशवनगर चिंचवड येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगन्नाथ देवीकर,पंजाबराव मोंढे संघ स्वयंसेवक मधुकर बच्चे,आदींसह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगन्नाथ देवीकर,यांनी सादर केलेल्या शिवचरित्रावर आधारित प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थितांच्या अंगात स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीची चेतना जागवली.
यावेळी संघ स्वयंसेवक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात वक्त्यांनी अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की,"छत्रपती शिवरायांनी शस्त्रासोबतच शास्त्रालाही तितकेच महत्त्व दिले.प्रत्येक नागरीकांनी ज्ञान,चारित्र्य,शिस्त,धैर्य आणि राष्ट्रनिष्ठा हे शिवरायांचे गुण आपल्या जीवनात अंगीकारले, तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीत योगदान देता येईल."त्यांच्या या मोलाच्या संदेशाने उपस्थितांना नवी प्रेरणा मिळाली.कार्यक्रमाच्या अखेरीस "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" "जय भवानी... जय शिवाजी!" या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि उपस्थितांच्या मनात शिवरायांप्रती अभिमान व राष्ट्रप्रेम अधिक दृढ झाले.हिंदवी स्वराज्याचा गौरवशाली इतिहास जपूया.शिवरायांचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनात रुजवूया! अशा अनेक संकल्पना यावेळी करण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या