कळवण तालुक्यातील सोनाली चव्हाण यांची केंद्र प्रमुख पदी नियुक्ती सर्वच स्तरातून अभिनंदन

(कळवण प्रतिनिधी)
नाशिक :- जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास पदाधिकारी विजय चव्हाण यांची कन्या सोनाली विजय चव्हाण,यांची कळवण तालुक्यातील मौजे पाळी येथे केंद्रप्रमुख या पदासाठी निवड झाली आहे.सोनाली चव्हाण,यांची  निवड झाली असल्याने,त्यांचे स्वागत शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,उपशिक्षणाधिकारी मनोहर सुर्यवंशी,वरिष्ठ सहाय्यक सलीम पटेल,यांनी सत्कार करत स्वागत केले.तसेच संत शिरोमणी गोरोबाकाका व केरोबा महाराज वारकरी परिवार,परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास,महाराष्ट्र राज्य नवयुवक कुंभार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य आदी संघटना पदाधिकारी,तसेच अशोक सोनवणे,संपादक लोकमंथन,हभप विजय चव्हाण,दत्तात्रय मोरे,माणिकराव रसाळ,निलेश राऊत,विजय जोर्वेकर,दिनेश शिंदे,कुंभार समाज महासंघ राज्याध्यक्ष विनायक राऊत,हभप गुलाबराव महाराज मावळ,अशोक महाराज खेडगाव,संजय महाराज ओझर,अंबादास गारे,नामदेव शिरसाट,आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या