नाशिक - मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण


(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- दिनांक 28 जुन 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम संपूर्ण भारतात राबविण्यात आला.नाशिक महानगरपालिका क्षेत्रात या कार्यक्रमाचे उदघाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हिरावाडी,पंचवटी येथे करण्यात आले.या कार्याक्रमाला महापौर  हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनिषा खत्री.अतिरिक्त आयुक्त,अमित रंजन,तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग,मनपा नाशिक वैदयकीय अधिकारी,कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने हजर होते.
सदर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम हा नाशिक शहरात विविध ठिकाणी प्रभाग सभापती व नगरसेवक यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील अपेक्षित लाभार्थि- 207560 त्यापैकी 158161 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. याप्रमाणे एकुण 76 टक्के कामकाज झालेले आहे.उर्वरीत 24 टक्के बालकांना दिनांक 29 जुन 2026 ते 3 जुलै 2026 दरम्यान घरोघरी जाउन कर्मचारी पोलिओ लस देतील.तरी नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या