अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण

महाराष्ट्रातील दुसऱ्या पिढीतील AVEIR AR2 एट्रियल लीडलेस पेसमेकरचेही पहिले प्रत्यारोपण
(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- हृदयरोग उपचार क्षेत्रात उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची कामगिरी करत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल,नाशिक येथे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सीमा नक्साने,यांनी ८० वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर (AVEIR DR) यशस्वीरित्या प्रत्यारोपित केला.हे उत्तर महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिले प्रत्यारोपण असून, या प्रक्रियेत वापरण्यात आलेले दुसऱ्या पिढीतील AVEIR AR2 एट्रियल लीडलेस पेसमेकर हे महाराष्ट्रातील पहिले प्रत्यारोपण ठरले आहे.ब्रॅडीकार्डियामुळे वारंवार बेशुद्ध पडण्याचे प्रसंग येत असलेल्या या रुग्णाची सखोल तपासणी केल्यानंतर लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला.पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत AVEIR DR मध्ये वायर किंवा लीड्सची आवश्यकता नसते आणि उपकरण थेट हृदयात बसविले जाते.या प्रणालीमुळे हृदयाच्या वरच्या व खालच्या कप्प्यांमध्ये समन्वय साधून हृदयाची गती नियंत्रित करण्यास मदत होते.यातील AVEIR AR2 हे दुसऱ्या पिढीतील उपकरण असून, पहिल्या पिढीच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक बॅटरी आयुष्य उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.यावेळी डॉ.सीमा नक्साने म्हणाल्या,ही कामगिरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नाशिकमध्ये झालेला महत्त्वपूर्ण प्रवेश“उत्तर महाराष्ट्रात प्रथमच AVEIR DR ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकरचे आणि महाराष्ट्रात प्रथमच दुसऱ्या पिढीतील AVEIR AR2 एट्रियल लीडलेस पेसमेकरचे प्रत्यारोपण करण्याचा मान अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलला मिळाला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना प्रगत कार्डियाक रिदम मॅनेजमेंटची सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध झाली आहे. अशा प्रगत उपचारांसाठी रुग्णांना मोठ्या महानगरांकडे जाण्याची आवश्यकता कमी व्हावी आणि अत्याधुनिक उपचार आपल्या भागातच उपलब्ध व्हावेत,हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.”या ऐतिहासिक प्रक्रियेबद्दल बोलताना डॉ.सीमा नक्साने यांनी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या संपूर्ण वैद्यकीय व सहाय्यक टीमचे आभार व्यक्त केले.या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेला कार्डिओलॉजी टीममधील डॉ. सुधीर शेतकर,डॉ.निर्मल कोलते, डॉ.महेश शिवाजी आहिरे,डॉ. कांचन भांबारे,डॉ.हेमंतराज आहिरे,क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. भाविक शाह,अनेस्थेशियोलॉजिस्ट डॉ.संदीप भंगाळे,आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ.अखिलेश सोमाणी,तसेच संपूर्ण कॅथलॅब टीम उपस्थित होती.या ऐतिहासिक प्रत्यारोपणामुळे उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी अत्याधुनिक कार्डियाक रिदम मॅनेजमेंट उपचारांची सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध झाली आहे. नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचारपद्धतींच्या माध्यमातून रुग्णांना त्यांच्या शहरातच प्रगत हृदयविकार उपचार मिळावेत, यासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल सातत्याने प्रयत्नशील आहे.MJPJAY व आयुष्मान भारत अंतर्गत हृदयरोगांवरील मोफत उपचार.अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पात्र रुग्णांसाठी MJPJAY आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हृदयरोगांवरील विविध उपचार मोफत उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.पात्र लाभार्थ्यांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले.तसेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हॉस्पिटलतर्फे ‘1947 Freedom Package’ हे विशेष आरोग्य तपासणी पॅकेज ₹१,९४७ मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये विविध रक्त तपासण्या, ECG, 2D Echo आणि Cardiologist Consultation यांचा समावेश आहे.नागरिकांनी हृदयाच्या आरोग्याची वेळेवर तपासणी करून घेण्यासाठी या विशेष पॅकेजचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.यावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड अनुप त्रिपाठी म्हणाले,“उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे हृदयविकार उपचार नाशिकमध्येच उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. त्याचबरोबर MJPJAY व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचार आणि ₹१,९४७ मध्ये उपलब्ध असलेल्या ‘1947 Freedom Package’च्या माध्यमातून नागरिकांना प्रतिबंधात्मक हृदय तपासणीची सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.नागरिकांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि हृदयाच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष द्यावे.”असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या