स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात सायकल रॅली महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी हिरवा झेंडा दाखवत केला शुभारंभ

नाशिक :- महानगरपालिका नाशिक व सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य दिनी विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सायकल रॅलीचा शुभारंभ महापौर हिमगौरी आहेर आडके यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.यावेळी उपमहापौर विलास शिंदे,स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप,आयुक्त मनीषा खत्री,प्रभाग सभापती सुरेश पाटील,राजेंद्र आहेर,नगरसेविका डॉ.हेमलता पाटील,नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे, यांचे सह मनपा अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.सायकल रॅलीचा मार्ग मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून सुरू झालेली सायकल रॅली अशोक स्तंभ - रविवार कारंजा मार्गे, रेड क्रॉस सर्कल - सीबीएस - रामायण बंगला येथे राईडची सांगता रामायण बंगला करण्यात आली. 
या रॅलीत वंदे मातरम भारत माता की जयभारत माता की अशा विविध घोषणांनी देशभक्तीपर वातावरण रॅलीच्या मार्गावर तयार झाले होते.सायकलिस्ट यांच्याकडे असणारे तिरंगे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि राष्ट्रभक्तीची भावना नागरिकांमध्ये वृद्धिंगत करण्याबरोबरच सायकलिंग,आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा या सायकल रॅलीचा प्रमुख उद्देश होता.या सायकल रॅली मध्ये सहभागी झालेल्या सायकलिस्टना नाशिक महानगरपालिकेतर्फे राष्ट्रध्वज मानवंदना देण्यात आले.राईड समन्वयक म्हणून मनोज गायधनी,यांनी भूमिका बजावली सायकल राईड यशस्वी करण्यासाठी उपायुक्त नितीन नेर,यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी मंजुषा पगार,यांनी काम पाहिले.या राईडमध्ये अध्यक्ष अमित घुगे,उपाध्यक्ष दविंदर सिंग भेला,सचिव नितीन कोटकर,संचालक कारभारी भोर,सुरेश डोंगरे,शुभम भालेराव, सीमा घुगे,माधुरी गडाख,अश्विनी कोंडेकर,दिपाली माळी हे सर्वजण सायकल रॅलीच्या नियोजनासाठी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या