नाशिक :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), नाशिक यांच्या वतीने "डिहायड्रेशन (निर्जलीकरण) आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम"११उद्योग भवन आयटीआय सिग्नलजवळ, त्र्यंबक रोड,नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.
फळे व भाज्यांना मूल्यवर्धित स्वरूप देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत फळे व भाज्यांचे शेल्फ लाइफ वाढविणे, त्यांचे मूल्यवर्धन करणे आणि त्यापासून विविध उत्पादने तयार करणे याला मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर डिहायड्रेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रशिक्षण होत आहे.या प्रशिक्षणामध्ये सहभागी उमेदवारांना डिहायड्रेशन उद्योगाविषयी सविस्तर माहिती, प्रत्यक्षिकासह प्रशिक्षण,बाजारपेठ व विक्री संधी, प्रकल्प अहवाल तयार करणे, Ready-to-Cook उत्पादन निर्मिती तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येईल.प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येईल.प्रशिक्षणादरम्यान पालक पावडर,कोथिंबीर,मेथी पावडर, आले-लसूण पावडर, हिरवी मिरची पावडर,गाजर-बीट पावडर,केळी पावडर,बनाना चीप्स,विविध फ्रूट फ्लेक्स,मिक्सर/डाळी उत्पादने तसेच इतर मूल्यवर्धित खाद्यपदार्थ तयार करण्याचे तंत्र शिकविण्यात येणार आहे.पाच दिवसांचा तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
उद्योजक,महिला बचत गट, शेतकरी, युवक-युवती तसेच स्वयंरोजगाराची इच्छा असलेल्या व्यक्तींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अधिक माहितीसाठी आरती शेलोरकर,प्रकल्प अधिकारी,एमसीईडी,नाशिक (9168667167),आलोक मिश्रा, विभागीय अधिकारी, एमसीईडी, नाशिक (9168667151) यांच्याशी संपर्क साधावा.
0 टिप्पण्या