सटाणा बांधकाम साहित्याच्या किरकोळ वादातून ठेकेदारासह दोन महिलांना मारहाण गुन्हा दाखल

सटाणा  :-जवळील ब्राह्मणगाव येथे बांधकाम साहित्यावरून वाद; एकावर विटेने व कटरने हल्ला, तिघांवर गुन्हा दाखलसटाणा:येथील जवळच असलेल्या ब्राह्मणगाव येथे बांधकाम साहित्य ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुण बांधकाम ठेकेदारावर कटर आणि विटेने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, ब्राह्मणगाव येथील रहिवासी आणि बांधकाम ठेकेदार यश राजेंद्र कुमावत (वय २४) यांनी त्यांचे बांधकाम साहित्य एका ठराविक ठिकाणी ठेवले होते. आरोपी हे साहित्य तिथून हटवत असताना, फिर्यादी यश कुमावत यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावरून आरोपींतांनी कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली.कटर आणि विटेने जीवघेणा हल्लाहा वाद इतका वाढला की तिघांनी यश कुमावत,यांच्यावर कटरने वार करून किरकोळ जखम केली,तसेच त्यांच्या डोक्यात बांधकामाची वीट मारून त्यांना गंभीर दुखापत केली.भांडण सुरू असल्याचे पाहून यश यांची आई आणि बहीण मध्यस्थी करण्यासाठी आणि भांडण मिटवण्यासाठी गेल्या असता, तिघांनी त्यांनाही बेदम मारहाण केली.'इथे कसे राहतात तेच बघतो',जीवे मारण्याची धमकी मारहाणीदरम्यान दिली.फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली."तुम्ही ब्राह्मणगाव येथे कसे राहतात तेच बघतो,"असे म्हणत 'जिथे आहात तिथेच जीवे ठार मारू',अशी धमकीही दिली.पोलीसांत गुन्हा दाखल याप्रकरणी फिर्यादी यश राजेंद्र कुमावत,यांच्या तक्रारीवरून सटाणा पोलीस ठाण्यात १)भूषण विष्णू कुमावत,२)प्रफुल्ल संजय आहिरे,आणि ३)शाहू संजय आहिरे (सर्व रा.ब्राह्मणगाव,ता.सटाणा, जि. नाशिक)यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलमान्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सटाणा पोलीस हवालदार देवरे,करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या