नाशिक :- चांदवड लासलगाव रोडवर दिघवड शिवारात ३२ किलो गांजा जप्त नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक डि एस स्वामी नाशिक ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे.याकारवाईबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.०४/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चांदवड परिसरात गस्त चालत असतांना,पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार चांदवड बाजूकडून लासलगावच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट कारमध्ये काही संशयीत इसम गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने चांदवड लासलगाव रोडवर दिघवड शिवारात सापळा रचून एक सफेद पांढऱ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर कारवर छापा टाकला.सदर कारमधुन खालील ०३ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले.
१) संदिप रामनाथ सानप, वय ३६, रा. कानडी मळा, सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक
२) अनिल केशव बोडके, वय ३०, रा. मापारवाडी, सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक
३) यश संदिप मोरे, वय २४, रा. कानडी मळा, सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक,या तिघा संशयीतांना विश्वासात घेवून त्यांचे कब्जातील स्विफ्ट डिझायर कार ची पंचासमक्ष झडती घेतली असता,सदर कारचे डिक्कीमध्ये ३२ किलो वजनाचा गांजा मिळून आला.यातील ताब्यात घेतलेले संशयीत हे विनापरवाना बेकायदेशिररित्या मानवी मनावर विपरित परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून कोठेतरी विक्री करण्याचे उद्देशाने अवैधरित्या वाहतुक करतांना मिळून आले असून त्यांचे विरुध्द चांदवड पोलीस स्टेशनला गुरंनं २७६/२०२६ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपींना वरिल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांचे कब्जातून ३२ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ,गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार क्र. MH-01-BT-8813, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण १४,७४,३००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास चांदवड पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहेत.अंमली पदार्थांची चोरट्या पद्धतीने होणारी तस्करी व विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या