चांदवड उपविभागीय कार्यालयात राडा;शासकीय कामात अडथळा बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!


चांदवड (नाशिक):- येथील उपविभागीय कार्यालयात (प्रांत ऑफिस) शिरून शासकीय कामात अडथळा आणणे,अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणे आणि त्यांची जाहीर बदनामी करणे याप्रकरणी एका संशयितासह त्याच्या दोन अनोळखी साथीदारांवर चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.चांदवड पोलीसांनी 
दिलेल्या माहितीनुसार चेतन उद्धव शेवाळे,आणि त्याच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी संगनमत करून चांदवड उपविभागीय कार्यालयात गोंधळ घालण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. उपविभागीय अधिकारी कैलास कडलग,हे त्यांच्या कॅबिनमध्ये शासकीय कामकाज करत असताना, हे संशयित विनापरवानगी आत घुसले.त्यांनी कार्यालयात आरडाओरड करून मोठा गोंधळ घातला.शासकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
या गोंधळात संशयितांनी कार्यालयातील शासकीय कर्मचारी संदीप गांगुर्डे,यांना जोराचा धक्का मारून बाजूला केले.याच दरम्यान उपविभागीय अधिकारी कैलास कडलग,हे बाहेरून कॅबिनमध्ये जात असताना,संशयित चेतन उद्धव शेवाळे,याने त्यांना पाठीमागून धक्का मारला आणि शासकीय कामात थेट अडथळा निर्माण केला.
पैशांचे आरोप करत केली बदनामी
केवळ धक्काबुक्कीवरच न थांबता, संशयितांनी "या अधिकाऱ्यांना स्वतःचे पैसे कमी पडतात,म्हणून हे शेतकऱ्यांचे पैसे घेऊन निर्णय फिरवतात,"असे आरोप करून अधिकाऱ्यांची जाहीर बदनामी केली. याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र चंद्रकांत कानडे, (वय ५३) यांनी चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३२, ३५२, ३५१(२), ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. ए. राऊत करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या