नाशिक :- कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन,यांच्या सुंदर नाशिक अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिक शहरात नंदिनी नदी स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न झाले.या अभियानामध्ये जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या प्रारंभी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेचे पूजन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन,यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.मुंबई नाका ते नासर्डी पूल परिसरादरम्यान वाहणाऱ्या नंदिनी नदीची स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.या अभियानात सेवेकरी,शिष्य,साधक, युवा कार्यकर्ते तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रसंगी नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे,प्रभाग सभापती मंगला प्रकाश ननावरे,गटनेते शाम बडोदे,नगरसेविका रुपाली यशवंत निकुळे,जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे,सुनील खोडे,सरचिटणीस सुनील देसाई,मंडळ अध्यक्ष उदय जोशी,प्रकाश ननावरे,बापू यशोद,गणपत वारडे,सचिन ननावरे,सुनील निकम,संकेत खोडे,निखिल खोडे,स्वाती वाटारे,सोनाली कुलकर्णी,तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या