कळवण :- तालुक्यातील देशमणे येथे एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे.फिर्यादी अर्जुन मंहत हिरे,(वय २१ वर्ष, व्यवसाय-व्यापार,रा.देशमाणे) यांची बजाज पल्सर १५० घटनास्थळ: देशमणे, ता. कळवण, जि. नाशिक येथून चोरीला गेली ६०,००० रुपये किमतीची ब्लॅक-रेड रंगाची बजाज पल्सर १५० (क्र. MH 41 BN 5515)
मोटरसायकल अज्ञात चोरट्याने घरभागातून किंवा परिसरातून चोरून नेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना ३० मे २०२६ रोजी दुपारी ३:०० ते रात्री ८:०० वाजेच्या दरम्यान घडली.फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने ही गाडी पळवून नेण्यात आली.चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा रंग ब्लॅक-रेड असून,तिची अंदाजे किंमत ६०,००० रुपये आहे.या गाडीची पाठीमागील नंबर प्लेट काळ्या रंगाची असून त्यावर सोनेरी (गोल्डन) रंगात नंबर लिहिलेला आहे.
फिर्यादी यांनी स्वतःच्या पातळीवर गाडीचा सर्वत्र शोध घेतला.मात्र, गाडी न सापडल्याने त्यांनी अखेर काल (४ जून २०२६) कळवण पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार नोंदवली.पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा (रजिस्टर क्र. १३३/२०२६) दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार (पोहवा/७२१) सोळंखे करत आहेत.
0 टिप्पण्या