मध्यरात्री धाडसी घरफोडी; चोराचा घरमालकावर स्क्रू-ड्रायव्हरने खुनी हल्ला,दोघे जखमी!


(देवळा प्रतिनिधी)
नाशिक :- जिल्ह्यातील देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उमराणे गावात मध्यरात्री एक खळबळजनक आणि थरारक घटना घडली आहे.घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या एका सराईत चोरट्याने घरमालक आणि त्यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.देवळा पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीताला बेड्या ठोकल्या आहेत.काय आहे नेमकी घटना? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,उमराणे येथील मराठी शाळेजवळ आणि ग्रामीण रुग्णालयाच्या मागे राहणारे फिर्यादी गोरख सुरेश सोनवणे,(वय ५८ वर्ष) यांच्या घरात ४ जून २०२६ रोजी पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.चोरटा शेख मुक्तार शेख मेहबुब (वय ३५ वर्ष, रा.नूरानी नगर,जामगाय,पाचोरा,जि.जळगाव हा चोरीच्या इराद्याने सोनवणे,यांच्या घरात बेकायदेशीरपणे शिरला.चोराने घरातील अंदाजे २४०० रुपये किमतीच्या चांदीच्या साखळ्या चोरल्या.मात्र,काहीतरी आवाज झाल्यामुळे घरमालक गोरख सोनवणे,आणि त्यांचे कुटुंबीय जागे झाले.त्यांनी प्रतिकार करताच चोराचा खुनी हल्ला! घरातील लोक जागे झाल्याचे पाहून चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला.फिर्यादींचे भाऊ पंढरीनाथ सुरेश सोनवणे, यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता,चोराने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर थेट स्क्रू-ड्रायव्हरने वार केला.पंढरीनाथ यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला,मात्र स्क्रू-ड्रायव्हर त्यांच्या उजव्या डोळ्याजवळील भिवईवर लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले.याच वेळी फिर्यादींचे पुतणे जगदीश पंढरीनाथ सोनवणे,हे काकांच्या मदतीला धावून आले.संतप्त चोराने जगदीश यांच्यावरही खुनी हल्ला चढवला.चोराने जगदीश यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वार केले आणि त्यांच्या छातीत स्क्रू-ड्रायव्हर खुपसून त्यांना गंभीर जखमी केले.याप्रकरणी देवळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून आरोपीत चोरटा शेख मुक्तार शेख मेहबुब,याला ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९, ३०५, ६४, ७(४), ३११, ३३१(७) अन्वये जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (गु.र.नं. १४२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक (PSI) हेमंत राऊत यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक (WAPI) पाटील करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या