कळवण :- घरासमोर साठलेले पावसाचे पाणी फेकण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मोहनदरी (ता. कळवण) येथे घडली आहे. या मारहाणीत फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 पावसाच्या पाण्यावरून काढली कुरापत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना दिलीप चव्हाण (वय ४५, रा. मोहनदरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ३ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर पावसाचे साठलेले पाणी फेकले. या गोष्टीला फिर्यादीने विरोध केला असता,जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार वाद वाढल्यानंतर समोरील पार्टीच्या लोकांनी फिर्यादी साक्षीदारांना हाताचापट्यांनी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.या दरम्यान गुलाब काशीनाथ चव्हाण,याने त्याच्या हातातील लाकडी कड्याने (दांडक्याने) फिर्यादीचे पती दिलीप चव्हाण यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच इतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.चार जणांवर गुन्हे दाखल या घटनेनंतर सुलोचना चव्हाण,यांनी कळवण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.पोलिसांनी गुलाब काशीनाथ चव्हाण,रविंद्र गुलाब चव्हाण यांच्यासह एकूण चौघाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा कलम ११५(२), ११७(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सध्या सर्व चारही जण फरार असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.कळवण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि सपोनि बोरसे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गवळी, या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.
0 टिप्पण्या