(कळवण प्रतिनिधी)
कळवण :- मौजे रवळजी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील जलजीवन मिशन गावातील भ्रष्टाचार संबंधित ठेकेदार व सरपंच यांच्या मनमानी कारभाराबाबत ग्रामपंचायत सदस्य धर्मा वाघ,भास्कर भिका भालेराव, उपसरपंच ग्रामपंचायत रवळजी यांनी सहाय्यक उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण यांचे कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण दिनांक पाच जून 2026 पासून सुरू केले आहे.त्यास अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार आंदोलन समिती कळवण तालुका अध्यक्ष दत्तात्रेय मोरे,विजय चव्हाण,रामदास वाघ,शिवसेना उप तालुकाप्रमुख कळवण यांनी पाठिंबा दिला आहे.जल जीवन मिशन योजनेची सखोल चौकशी व्हावी,अशी मागणी करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या