चांदवडमध्ये घरासमोरून 'बुलेट' लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल!


चांदवड (नाशिक):- चांदवड शहरातील आदर्श कॉलनी परिसरामध्ये घरासमोर उभी केलेली २० हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर नरहर पाटील,(वय ४३, धंदा: नोकरी, रा.आदर्श कॉलनी,चांदवड) यांनी आपली बुलेट घरासमोर पार्क केली होती. दिनांक ३१ मे २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेपासून ते १ जून २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान,कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीच्या संमतीशिवाय ती गाडी लबाडीच्या इराद्याने चोरून नेली.चोरीला गेलेल्या वाहनाचा तपशील खालील प्रमाणे आहे.

वाहनाचा प्रकार: बुलेट रॉयल इनफिल्ड ३५० (क्लासिक मॉडेल)
गाडीचा नंबर: MH 15 FW 2014
गाडीचा रंग: काळा
अंदाजे किंमत: २०,०००/- रुपये
चेसी नंबर: ME3U3S4C9HA073317

पोलीस तपास सुरू:
याप्रकरणी फिर्यादीने चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून,पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवादार ए. वाय. जाधव करत आहेत.परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या