नाशिक:-०५/०७/२०२६-भारतीय जनता पार्टी,नाशिक महानगरच्या वसंत स्मृती कार्यालयात उत्तर महाराष्ट्र संघटन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.यावेळी,जिल्हाध्यक्ष, नगरसेवक नगरसेविका लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,SIR विधानसभा प्रमुख आणि BLA-2 पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली असून त्यांना संघटनात्मक कार्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या बैठकीस विधान परिषद आमदार माधवीताई नाईक,नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार,सुनील बच्छाव,यतीन कदम,निलेश कचवे, प्रदेश चिटणीस रोहिणीताई नायडू वानखेडे,उपाध्यक्ष सुनील फरांदे, नाशिक महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील देसाई,मनपा गटनेते ॲड.शाम बडोदे,नेते नाना शिलेदार,तसेच सर्व आघाडीचे अध्यक्ष,मंडळ अध्यक्ष,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी,आगामीउपक्रमांचे नियोजन,बूथ सक्षमीकरण,मन की बात आणि जनसंपर्क मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
0 टिप्पण्या