मोठी बातमी: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून राज्यात ४६३ कोटी रुपयांचे वाटप!



वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वानंद सोनार यांची माहिती,नाशिकला भेट

नाशिक :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून मागील १४ महिन्यांत नियमित रुग्णालयांना ४१६ कोटी रुपये, आपत्कालिन प्रकरणे (नैसर्गिक आपत्ती व अपघात) २५.९१ कोटी रुपये, तर विशेष बाब म्हणून २० कोटी ७७ लाख रुपये असे ४६३ कोटी ५८ लाख रुपयांची मदत राज्यातील गरजू रुग्णांना देण्यात आली आहे,अशी माहिती कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वानंद सोनार,यांनी दिली आहे,असे कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनार नुकतेच नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,यांची भेट घेतली.यावेळी कक्षाचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.चैतन्य बैरागी,समाजसेवा अधीक्षक प्रकाश भोये,वैद्यकीय समन्वयक अमित डेरे,शुभम अहिरे,आदी उपस्थित होते. डॉ.सोनार यांनी सांगितले की,या कक्षाचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहायता कक्षाचे काम सुरू आहे.या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्यात येत आहे. डॉ.सोनार यांनी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना भेट देत तेथे दाखल रुग्णांशी संवाद साधला.तसेच रुग्णालयातील नोंदी,रुग्णांवरील औषधोपचार,आरोग्य तपासणीचे अहवाल,शस्त्रक्रिया याविषयी माहिती डॉ.सोनार यांनी घेतली. 

याशिवाय डॉ.सोनार यांनी सामाजिक दायीत्व निधीच्या माध्यमातून आरोग्य सेवेच्या बळकटीकरणबाबत ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार,‘आयमा’चे अध्यक्ष पानसरे,महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा यांच्याशी संवाद साधला.तसेच त्यांना आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना मदतीचे त्यांनी आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या