नाशिक :- केंद्र व राज्य शासनाने चालू वर्षासाठी वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण बंधनकारक केले असून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पूर्वी ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.राज्यात २०२६ मध्ये विशेष ई-केवायसी मोहीम राबविण्यात येत असून, सर्व पात्र लाभार्थींनी मुदतीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे यामुळे योजनेतील पारदर्शकता वाढविणे,त्रुटी दूर करणे आणि लाभ प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे व आगामी हप्त्यांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे.शेतकऱ्यांनी जवळच्या सामायिक सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे किंवा ‘पीएम किसान’मोबाईल अॅपद्वारे स्वतःच्या चेहऱ्यावरील ओळख (Face Authentication) पडताळणी करून ई-केवायसी पूर्ण करावी.ज्येष्ठ नागरिक,आजारी अथवा केंद्रावर जाण्यास असमर्थ लाभार्थ्यांसाठी गावपातळीवरील ग्रामसेवक,कृषी सहाय्यक आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत केली जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या