कळवण :- कळवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवी बेज शिवारातून एक जुनी बजाज प्लॅटीना मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांनंतर पोलिसांत तक्रार मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास शिवनाथ राहणे (वय ३५, धंदा शेती,रा.थापगाव,ता.वैजापूर, जि. संभाजीनगर) यांची ३०,००० रुपये किमतीची सिल्वर रंगाची बजाज प्लॅटीना मोटरसायकल (क्रमांक: MH-20-JR-2659) १८ मे २०२६ रोजी दुपारी १२ ते दुपारी पावणेचार वाजेच्या दरम्यान नवी बेज शिवारातील देवरे वस्ती येथून चोरीला गेली.फिर्यादीने स्वतःच्या पातळीवर गाडीचा सर्वत्र शोध घेतला,परंतु गाडी मिळून न आल्याने त्यांनी अखेर २२ मे रोजी पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांकडून तपास सुरू
फिर्यादीच्या तक्रारीवरून कळवण पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भा.न्या.संहिता कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गवळी (बकल नंबर १८५१) करत आहेत.
0 टिप्पण्या