घोटी पोलीस स्टेशन गुन्हे
Ghoti Police Station
इगतपुरी जबरी चोरी
Igatpuri Theft News
नाशिक गुन्हेगारी वृत्त
Nashik Crime News Today
सोन्याची चैन चोरी इगतपुरी
Gold Chain Snatching
घोटी क्राईम न्यूज
Ghoti Crime News
मुख्य आरोपीत गजाआड(घोटी प्रतिनिधी)
इगतपुरी :- तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील रस्त्यावरील भूमी शेडजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. ६१ वर्षीय वृद्धाशी झटापट करत ४ अज्ञात चोरांनी सोन्याची चैन आणि महागडा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी मुख्य आरोपीताला अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मुरलीधर नाकते(वय ६१,रा. दिवा,ठाणे; मूळ रा.अडसरे बु॥, इगतपुरी) हे १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अडसरे बुद्रुक परिसरातील रस्त्यावरून जात होते.यावेळी तिथे आलेल्या ४ अज्ञात इसमांनी त्यांच्याशी वाद घालत झटापट सुरू केली.चोरांनी नाकते यांच्या गळ्यातील सुमारे ६५ हजार रुपये किमतीची तोळ्यांची सोन्याची चैन आणि ७ हजार रुपये किमतीचा 'Vivo Y 29 5G' मोबाईल,असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला.
मुख्य आरोपीताला पोलिसांकडून अटक चोरीस गेलेल्या मालाचा स्वतः शोध घेत असल्याने फिर्यादी नाकते यांना तक्रार देण्यास उशीर झाला. त्यानंतर त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली. घोटी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०९(४) आणि ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली.या गुन्ह्यातील मुख्य सं आरोपीत रमी उत्तम पवार (वय ३२, रा.भरवीर बु,इगतपुरी) याला २३ मे २०२६ रोजी मध्यरात्री १:१८ वाजता घोटी पोलिसांनी अटक केली आहे.इतर चोरांचा शोध सुरू
या गुन्ह्यात रमी पवार,याच्यासोबत आणखी ३ अज्ञात आरोपीतांचा समावेश होता.त्यातील एका इसमाचा रंग काळा असून त्याच्या हातापायावर पांढरे ठिपके असल्याची माहिती समोर आली आहे.घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) देवरे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून,फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
0 टिप्पण्या