crime news - अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी जेसीबीसह १६ हजारांची वाळू जप्त,दोघांवर गुन्हा दाखल


सटाणा :-  रात्रीच्या साडेआठ वाजेच्या सुमारास आराम नदी पात्रातून आरोपीतांनी त्यांच्या ताब्यातील जेसीबीच्या साहाय्याने अवैधरीत्या वाळूचे उत्खनन सुरू केले.नदीपात्रातून सुमारे दोन ते अडीच ब्रास वाळू उपसून त्याचा साठा गोळा केला जात होता.या बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.विनापरवाना आणि अवैधरीत्या अंदाजे १६,२५० रुपये किमतीची वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.दोघांवर गुन्हा दाखल याप्रकरणी नितीन शांताराम विसपुते,(वय ५१, व्यवसाय:नोकरी,रा.गोल्डगॅलिफ बिल्डिंग,नामपूर रोड, सटाणा) यांनी सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हे नोंदवले आहेत:१) जेसीबी (क्रमांक MH-41-AS-5162) वरील चालक आशिष (पूर्ण नाव माहीत नाही)२) समीर शिवाजी पाटील (रा. सटाणा, जि. नाशिक)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीतांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या दोन्ही आरोपीतावर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३०३ (२), ६२ आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा (गुरन २७२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार (बकल नंबर ९१८) मदाणे करत आहेत.नदीपात्रातून होणाऱ्या अशा बेकायदेशीर उपशामुळे पर्यावरणप्रेमींमधून चिंता व्यक्त होत असून,पोलीसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या