महापुरुषांना अभिवादन करत इगतपुरी आगारात जागतिक आदिवासी दिन साजरा

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
इगतपुरी :- राज्य परीवहन इगतपुरी आगार येथे 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला यावेळी धरती आबा बिरसा मुंडा,राघोजी भांगरे,छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,शाहू फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून मान्यवरांनी आदिवासी परंपरा,आदिवासी चे हक्क,महत्व यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्टॅन्ड इन्चार्ज श्री ढाकणे साहेब श्री चोपडे साहेब तसेच प्रमुख मान्यवर पाहुणे ह.भ.प.घोडे महाराज आदिवासी प्रबोधनकर कैलास भांगरे,आदिवासी प्रवक्ते संजय गातवे,शरद बांबळे,आदी उपस्थित होते.डेपोचे आदिवासी स्वयंसेवक शिवाजी डगळे, संतोष धोंगडे,नामदेव जाधव,मदन बेंडकोली चक्रधर थेरे,आदी उपस्थित होते.याप्रसंगी भारमल मॅडम यांनी सूत्रसंचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या