Nashik - दिव्यांगांच्या अनुदानाची रक्कम वाढवण्याची प्रहार संघटनेची मागणी


(नाशिक प्रतिनिधी)
नाशिक :- प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,यांच्या दालनात उपायुक्त नितीन नेर यांच्या उपस्थितीत,दिव्यांगांच्या समस्या प्रश्नी पदाधिका-यांसमवेत बैठक झाली.यावेळी राखीव दिव्यांग निधीतून दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी प्रमुख मागणी जिल्हाध्यक्ष ललित पवार यांनी केली.राखीव दिव्यांग निधी अखर्चित राहत असल्याने दिव्यांगांना दरमहा देण्यात येणारे अनुदान तीन हजार वरून ६००० हजार करण्यात यावे, दिव्यांग भवनात सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,प्रलंबित दिव्यांगांची प्रकरणे तातडीने मार्गी लावावी आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिव्यांगांच्या सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिले.प्रसंगी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पवार,दत्ता कांगणे,पंकज सूर्यवंशी सुभाष निकाळजे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या