इगतपुरी (प्रतिनिधी): घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, घोटी गावातील एचपी गॅस ऑफिससमोरून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल लालचंद जगताप (वय ३१, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) यांनी आपली निळ्या-काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 15 DZ 1593) घोटी गावातील १४ नंबर, एचपी गॅस ऑफिससमोर पार्क केली होती. दि. २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ४:३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय ही दुचाकी चोरून नेली.
या चोरीच्या घटनेनंतर निखिल जगताप यांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीची किंमत अंदाजे ७,००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुढील तपास घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बोराडे करत आहेत. भरवस्तीतून दुचाकी चोरीला गेल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0 टिप्पण्या