पेठ (नाशिक) :- पेठ तालुक्यातील पार नदी पात्रातून विनापरवाना गौण खनिजाची (वाळू) अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे २०२६ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास झरी शिवार येथील पार नदीच्या पात्रात ही घटना घडली.महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शिवाजी छबु भोये हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना,त्यांना एक निळ्या रंगाची ट्रॉली असलेला विना क्रमांकाचा 'स्वराज' कंपनीचा ट्रॅक्टर वाळू भरून नेताना आढळला.पथकाने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता,ट्रॅक्टर चालकाने अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर सोडून तेथून पळ काढला.या कारवाईत सुमारे ६,५०० रुपये किमतीची वाळू आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. या ट्रॅक्टरचा इंजिन नंबर DE५००४SFM२७९९५ आणि चेसी नंबर MNBT५३NAPTMO०१८२ असा आहे.याप्रकरणी मंडळ अधिकारी शिवाजी भोये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १८२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक गोंदके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. आर. पगारे (बकल नंबर ११६) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाने कडक पाऊले उचलल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या