Nashik crime Malegaon crime
Breaking news latest news
नाशिक/मालेगाव :- नाशिक ग्रामीण जिल्ह्याला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव शहरात धडाकेबाज कारवाई केली आहे.या कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून,त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे सापळा
दिनांक २१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला आयशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित इसम घातक शस्त्रे घेऊन वावरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी रमजानपुरा येथील अर्बन हेल्थ सेंटर शेजारील मोकळ्या मैदानात सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले.
या आरोपींना केली अटक
१.वसीम शेख इस्माईल (वय २८, रा. पाचपंजतन चौक, मालेगाव)
२.मुशीर अली मुन्न अली सैय्यद (वय २९, रा. जाफरनगर, मालेगाव)पोलिसांनी या संशयितांची अंगझडती घेतली असता,त्यांच्याकडे विनापरवाना देशी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळून आली.या दोघांविरोधात आयशानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये (कलम ३/२५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून,त्यांच्यावर यापूर्वीही मालेगावमधील विविध पोलीस ठाण्यांत जबरी चोरी,प्राणघातक हल्ला आणि गंभीर दुखापतीसारखे गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मालेगाव शहरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या