पत्रकारांना अर्वाच शिवीगाळ,मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध.!

खासदार संजय दिना पाटलांची सत्तेची मग्रुरी! पत्रकारांना पोलीसांसमोरच जीवे मारण्याची धमकी आणि अर्वाच्य शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल


मुंबई :- ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील,यांची सत्तेची मग्रुरी कॅमेऱ्यासमोर आली आहे. नुकतेच उद्धव ठाकरे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील,यांनी राजकीय प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची थेट धमकी दिली आहे. विशेष म्हणजे,घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांसमोरच हा सर्व धक्कादायक प्रकार घडला.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राज्याभरातील पत्रकार संघटना तसेच पत्रकारामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
माध्यमांच्या प्रतिनिधींनी खासदार संजय दिना पाटील,यांना चालू राजकीय घडामोडींवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला.प्रश्न विचारताच खासदारांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्रकारांवर अरेरावी सुरू केली."तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारून पाठवेन.हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा,पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला काय करायचंय ते करा," अशा अत्यंत खालच्या आणि गुंडशाहीच्या भाषेत त्यांनी पत्रकारांना दम दिला आहे.यासर्व प्रकरणी विरोधाकांनी निषेध नोंदवला आहे.
चौथ्या स्तंभावर हल्ला;विरोधक आक्रमक लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर लोकप्रतिनिधीकडून झालेल्या या शाब्दिक हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत,यांनी यावर कडक शब्दात आक्षेप घेतला असून,संजय दिना पाटील,यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनीही या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून,नाना पटोले यांनी विधानसभेत/सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत गृहविभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

पत्रकार संघटनांकडून जाहीर निषेध
महाराष्ट्रात 'पत्रकार संरक्षण कायदा' अस्तित्वात असतानाही,एका सत्ताधारी खासदाराने पोलीसांच्या उपस्थितीत पत्रकारांना मारण्याची भाषा करणे हे कायद्याचे धिंडवडे काढणारे आहे,अशी टीका होत आहे.विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा जाहीर निषेध केला असून संबंधित खासदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.प्रसिद्धी प्रमुख ही खासदार संजय दिना पाटील,यांचा जाहीर निषेध नोदवत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या