यावेळी रविशंकर मार्ग येथे सुरू असलेले पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.गेल्या चार महिन्यांपासून या कामामुळे नागरिकांना वाहतूक व प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.
तसेच रविशंकर मार्गावरील खुल्या गटारींचे बंदिस्तीकरण तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. या गटारीमधून मोठ्या प्रमाणावर विषारी वायू व दुर्गंधी निर्माण होत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात आले.
याशिवाय वडाळा गावातील काही गोठ्यांमधील सांडपाणी व मलमूत्र या नाल्यात सोडले जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.संबंधित गोठ्यांवर कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात,असे निवेदन आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले.यावेळी पुर्व विभाग सभापती मंगला नन्नावरे, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत खोडे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे,प्रकाश नन्नावरे, ऋषिकेश बुचकुळे, सचीन नन्नावरे, राहुल नन्नावरे,तसेच प्रभाग क्रमांक २३ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या