मंत्री पंकजाताई मुंडे यांचा पशुसंवर्धन विभाग भरती प्रक्रिया बाबत विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे
राज्यातील पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणावर अधिकारी रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवा, पशुधन आरोग्य तपासणी, लसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून संबंधित उमेदवारांची परीक्षा सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत होणार असल्याचे नमूद केले आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या