आंबा व मिलेट (तृणधान्य) महोत्सवाचे शहरात आयोजन - बी सी देशमुख
नाशिक दि. 6 मे :- तृणधान्यांपासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणाऱ्या नवउद्योजकांना तसेच आंबा उत्पादकांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय,नाशिक यांच्या वतीने ‘आंबा व मिलेट (तृणधान्य) महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे.‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या संकप्लनेवर आधारीत हा महोत्सव ८ ते १० मे २०२६ या कालावधीत उदोजी महाराज संग्रहालय, आकाशवाणी टॉवरजवळ, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे.नागरीकांनी या महोत्सवास भेट द्यावी,असे आवाहन पणन मंडळाचे विभागीय उपसरव्यवस्थापक एस. वाय.पुरी व विभागीय व्यवस्थापक बी.सी. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार 8 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. आंबा विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थ वगळून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या प्रतीचा आंबा मिळावा तसेच तृणधान्याचे महत्व नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात 40 स्टॉल्सद्वारे आंबा,मिलेट व त्यापासून बनविलेल्या उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्यात आली आहे.महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदूर्ग,पालघार व ठाणे या जिल्ह्यातील जी.आय मानांकन मिळालेला हापूस आंबा तसेच राज्यातील केशर,पायरी व इतर वाणांचा आंबा येथे उपलब्ध होणार आहे.तसेच तृणधान्य उत्पादक,प्रक्रीया उद्योगांमध्ये कार्यरत असणारे बचत गट,सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक कंपन्या, नव उद्योजक महोत्सवात सहभागी होणार आहेत.याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय व्यवस्थापक देशमुख यांच्याशी मोबाईल क्रमांक 9423617035 संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा