मुख्य टपाल कार्यालयासह पाच ठिकाणीआजपासून समर्पित आधार सेवा केंद्र सुरू

नाशिक :- नाशिक विभागातील नागरिकांना आधार नोंदणी व अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागाच्या टपाल खात्यांतर्गत पाच टपाल कार्यालयांमध्ये समर्पित आधार सेवा केंद्रे शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सुरू करण्यात येणार आहेत.टपाल विभागाचे वरीष्ठ अधीक्षक प्रफुल्ल आर.वाणी यांनी ही माहिती दिली आहे.

टपाल कार्यालयांची नावे व त्यांची वेळ अशी : नाशिक मुख्य टपाल कार्यालय,नाशिक रोड मुख्य टपाल कार्यालय- सकाळी १० ते सायंकाळी ५. पंचवटी टपाल कार्यालय, सिडको कॉलनी टपाल कार्यालय- सकाळी ९ ते दुपारी ४, सिन्नर टपाल कार्यालय- सकाळी ८ ते दुपारी ३. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना नवीन आधार नोंदणी,पत्ता बदल,मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आदी सुविधा उपलब्ध होतील. नागरिकांनी या केंद्रांचा लाभ घ्यावा,असे आवाहन वरीष्ठ अधीक्षक वाणी यांनी केले आहे. 

टिप्पण्या